Headlines

पैठण तालुक्यात 46 हजार नागरिकांची तहान टँकरवर‎:14 गावांना 25 खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी; आडूळ तांडा येथे टंचाईची स्थिती बिकट‎



ऑगस्ट महिना संपत आला तरी पावसाने तब्बल एक महिन्यापासून ओढ दिल्याने पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यासारखी भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पावसाळ्यातही तालुक्यातील १४ गावे आणि वाड्या-वस्त्यांमधील तब्बल ४६ हजार ८४२ नागरिकांची तहान टँकरच्या पाण्

.

विशेष म्हणजे, केवळ पैठणच नव्हे तर छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातूनही नवीन टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव आले आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात टँकरची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यातील आडूळ खुर्द (२,०००), अब्दुल्लापूर तांडा (१,२५०), खादगाव (३,९८६), दोरेखेडा-बंगला तांडा-बन्नी तांडा-नरसिंग तांडा (१,८७६) आणि केकत जळगाव (४,९००) येथील नागरिक पूर्णपणे टँकरवर अवलंबून आहेत. सर्वाधिक गंभीर परिस्थिती आडूळ खुर्द, आडूळ तांडा, खडकी तांडा, जमालवाडी तांडा आणि पिंपळवस्ती या भागात आहे. येथे १५ हजार लोकसंख्येसाठी तब्बल ७ टँकर चालवले जात असून, नागरिकांना दररोज पाण्यासाठी तासनतास वाट पाहावी लागत आहे. याशिवाय ब्राह्मणगाव तांडा (९६८), लिंबगाव (३,०००), मुरमा (२,६००), धेरगाव (३,१७२), पारडी (२,३७०), सुलतानपूर (१,३००), वडजी (१,८२०) आणि सोलनापूर (२,६००) या गावांमध्येही टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. टंचाईग्रस्त भागासाठी सध्या केवळ एकच विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. टँकर भरण्यासाठी विहिरींची संख्या कमी आहे.

टंचाईच्या तीव्रतेनुसारच टँकर वाढवले जातील Ãपावसाने ओढ दिल्यामुळे ज्या गावांतून मागणी येत आहे, तेथे टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पैठणसह छत्रपती संभाजीनगर आणि गंगापूर तालुक्यातूनही टँकरचे प्रस्ताव आले असून तेथेही पुरवठा सुरू आहे. टंचाईची तीव्रता पाहता मागणी वाढते आहे. स्थानिक जलस्रोत तपासून गरजेनुसार टँकर वाढवले जातील. सध्या प्रशासनाकडे प्रस्ताव येत आहेत. – राजेश कांबळे, सहायक गटविकास अधिकारी, पैठण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *