Headlines

कन्नड येथील विद्यार्थिनींनी जवानांना पाठवल्या राख्या:कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयाचा उपक्रम‎




कन्नड रक्षाबंधनाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कर्मवीर काकासाहेब देशमुख माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वतःच्या हाताने राख्या तयार करून सीमेवर पाठवल्या. ‘सीमेवरचा जवान हा आमचा भाऊ’ या भावनेतून राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमातून विद्यार्थिनींमधील देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी दिसून आली. कडाक्याची थंडी, ऊन आणि पावसाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळेच आपण सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतो. त्यामुळे त्यांच्या मनगटावर बहिणीच्या प्रेमाचा धागा पोहोचावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सागर जाधव, मुख्याध्यापक रवींद्र पाटील, पर्यवेक्षक गणेश डव्हारे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रदीप सनंसे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून भाग्यश्री खैरनार, करण राठोड, सौरभ हिरे, देविदास चौधरी, भागवत पल्हाड, द्वारका ढगे आणि संगीता आहिरे यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनींनी दाखवलेल्या या राष्ट्रभक्तीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या उपक्रमात ६७८ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या उपक्रमात शाळेतील तब्बल ६७८ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. अत्यंत सुरेख व कल्पक राख्या बनवणाऱ्या साक्षी चोपडे, काश्मिरा शेख, चंद्रकांत कुराडे, गौरी कुराडे, आराध्या पवार, बुशरा शहा, तनवी जाधव, भक्ती भिंगारे, सृष्टी जाधव, जानवी मोहिते, हर्ष दरेकर, आयुष गोंडे, तनवी धनेधर व स्वरा मोहिते या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. कन्नड येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयातील विद्यार्थिनींनी सैनिकांसाठी राख्या बनवल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *