![]()
पोटच्या ५ दिवसांचा मुलाची ७० हजार रुपयांत विक्री करणाऱ्या निर्दयी मातेला आयशानगर पोलिसांनी अटक केली. फरजाना चांद शेख असे तिचे नाव आहे. तिला गुरुवारी ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. महिलेस खोट्या कागदपत्रांद्वारे गुन्ह्यात गोवल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केला आहे. फरजाना हिचा विवाह फार काळ टिकला नाही. सध्या ती एकटी राहायची. तिला जुलैमध्ये मूल झाले. नंतर तिने हे मूल विकले. हे कळताच पोलिसांना महिलेची चौकशी केली. त्यात तिने मूल विकल्याची कबुली दिली. तिला अटक करून इतर चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मुुलाचा शोध सुरू आहे. धागेदोरे तामिळनाडूपर्यंत… धारावी पोलिस ठाण्यात बालके विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना फरजाना हिची बाळंतपणाची फाइल सापडली होती. हे एक मोठे रॅकेट असून याचे धागेदोरे तामिळनाडूपर्यंत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Source link
मालेगावात 5 दिवसांच्या मुलाची आईकडून 70 हजारांमध्ये विक्री:महिलेस अटक, पाच दिवसांची कोठडी