Headlines

45 वर्षांनंतर कन्नड एसटी आगाराच्या मजबुतीकरणासाठी दोन कोटींचा निधी:नगर परिषद, महामंडळाच्या समन्वयातून पर्यटन विकास साधणार‎



कन्नड बस आगाराच्या आवारात सिमेंट काँक्रिटच्या माध्यमातून मजबूतीकरणासाठी पंचेचाळीस वर्षांनंतर दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, यामुळे आगाराचे वैभव वाढले आहे. आगामी काळात नगरपरिषद व एसटी महामंडळ एकत्र येऊन शहराचा व परिसराचा पर्यटन विकास साधणार

.

कन्नड बस आगाराच्या मजबूतीकरणासाठी शासनाच्या एमआयडीसीकडून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाचा सविस्तर आढावा घेऊन आगारप्रमुख विजय कालवणे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद यांनी आगारप्रमुखांच्या उत्कृष्ट कामकाजाचा गौरव केला. नगरसेवक अब्दुल जावेद यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, तत्कालीन आमदार बाबुरावजी औराळकर आणि नगराध्यक्ष रहेमान सेठ यांच्या प्रयत्नांतून आगारासाठी पूर्वी निधी आला होता. त्यानंतरच्या ४५ वर्षांत शहराची लोकसंख्या ५५ हजारांहून अधिक झाली आहे. आता आगाराच्या प्लॅटफॉर्मचे मजबूतीकरण पूर्ण झाले आहे. नगरपरिषदेने आगाराच्या बाजूने बीओटी तत्त्वावर दुकाने उभारण्याचा प्रस्ताव व विकास आराखडा शासनाकडे सादर केला आहे. यामुळे बसस्थानक परिसरातील अतिक्रमणे हटून सुशोभीकरण होईल. तसेच, आगामी ५० वर्षांचा विचार करून ३० टक्के जागा राखीव ठेवली जाणार आहे. या आगारात एक आगारप्रमुख, एक वाहतूक निरीक्षक, एक सहायक वाहतूक निरीक्षक आणि नऊ वाहतूक नियंत्रक असे एकूण २१ प्रशासकीय कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी निवासस्थानेही याच आवारात उभारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने, राजू शेख कमिटी, गोकुळ राठोड, सहायक वाहतूक अधिकारी संघर्ष पगारे, श्रीराम पवार, जे. एस. पांडव, अंकुश गाडेकर, संतोष बैरागी, अमोल भिंगारे, भावलाल सुर्वे, विजय सिरसाठ, शरद वाघ, असद पवार, माणिक आबा पगारे आणि कडुबा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. सभेचे आभार स्वप्नील औराळकर यांनी मानले.

५,००० स्क्वेअर मीटर मजबुतीकरण आगारप्रमुख विजय कालवणे म्हणाले की, नगराध्यक्ष फरीन बेगम अब्दुल जावेद व नगरसेवक अब्दुल जावेद यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामे मार्गी लागली आहेत. आगाराच्या १०,५०० स्क्वेअर मीटर जागेपैकी ५,००० स्क्वेअर मीटर जागेवरील प्लॅटफॉर्मचे मजबूतीकरण व ड्रेनेज लाईनचे काम पूर्ण झाले आहे. एमआयडीसीचे सहायक अभियंता योगेश तिडके यांनी सांगितले की, कार्यकारी अभियंता रमेशचंद्र गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पार पडले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *