![]()
भारतीय सैनिकांच्या मनगटावर रक्षाबंधनाच्या दिवशी प्रेम, कृतज्ञता आणि देशभक्तीचा धागा बांधण्यासाठी सावेडी येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील ८३४ विद्यार्थ्यांनी अनोखा संकल्प साकारला. भारतीय टपाल विभागाच्या उत्तर उपविभाग, सहाय्यक अधीक्षक कार्यालय,
.
प्राचार्या वसुधा जोशी यांच्या पर्यावरणपूरक ‘समर्थ राखी’ संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठा, लाकूड, लोकर, दोरा यांसह विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला. आरसे, मणी, टिकल्या, रंगीत दगड, तिरंगी ध्वज, बिया, कडधान्य, कापूस व बटणे अशा वस्तूंना कल्पकतेने नवे रूप देत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेला देशभक्तीची जोड देण्यात आली. प्रत्येक राखीत जवानांसाठी प्रेम आणि शुभेच्छांचा संदेश गुंफण्यात आला.
भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘जय जवान, जय किसान…’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी टपाल विभागाचे पोस्टमन अक्षय अजबे, हरीश गांगुर्डे, भाऊराव शेलार, सार्थक वेताळ, बाळासाहेब गाडे यांच्याकडे राख्या सुपूर्द केल्या. पर्यवेक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी म्हणाले, सैनिकांसाठी राखी तयार करणे म्हणजे केवळ एक कलाकृती तयार करणे नाही; तर विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, कृतज्ञता आणि राष्ट्रीय एकात्मतेची बीजे रुजविणे आहे. या राख्यांमधून सैनिकांप्रती असलेला आदर आणि बंधुभाव अधिक दृढ झाला आहे. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते. कलाशिक्षक विवेक भारताल व स्वाती घुले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. अमोल बागुल यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले तर अरुण राशिनकर यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक राख्या विद्यार्थ्यांनी कागद, पुठ्ठा, लाकूड, लोकर, दोरा यांसह विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला. आरसे, मणी, टिकल्या, रंगीत दगड, तिरंगी ध्वज, बिया, कडधान्य, कापूस व बटणे अशा वस्तूंना कल्पकतेने नवे रूप देत ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेला देशभक्तीची जोड देण्यात आली. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनीही मोलाची मदत केली. त्यामुळे हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. या उपक्रमाच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती आणि सामाजिक जाणीव निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या उपक्रमाचे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मनापासून कौतुक केले.