![]()
पक्क्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना आशेचा किरण ठरणार आहे. योजनेच्या लाभासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात तालुक्यातील ९५ गावांमधून तब्बल ३१ हजार १६७ कुटुंबांची नोंद झाली आहे. गावोगावी विशेष ग्
.
यादीत नाव नोंदवले नसेलतर नव्याने नोंदवण्याची संधी
ग्रामसभेत हरकत नोंदवण्याचे आवाहन ^घरकुल यादी बाबत ज्यांना आक्षेप आहेत, तसेच सर्वेक्षणावेळी ज्यांची नावे यादीत आलेली नाहीत,अशा नागरिकांनी विशेष ग्रामसभेत आपली हरकत नोंदवावी. छाननी व पडताळणी नंतर यादीमधील अपात्र नावे कमी तर पात्रता निकष पूर्ण करणारी नवीन नावे समाविष्ट होऊ शकतात. गरजूंनी नावे दाखल करावीत.ग्रामसभेत आलेल्या हरकतींची चौकशी करुनच अंतिम यादी अपलोड केली जाणार आहे. अंतिम मंजुरी शासनाच्या निकषांनुसारच होणार आहे. – अमोल जाधव, गटविकास अधिकारी, पंढरपूर