Headlines

सोनई, बेलवंडीत गुटखा विक्रेत्यांवर छापे:89 हजार रुपयांचा माल जप्त




सोनई आणि बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने २७ ऑगस्ट रोजी अवैध गुटखा व मावा विक्रेत्यांवर ५ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण ८९ हजार ३६६ रुपये किमतीचा गुटखा, मावा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला असून ८ आरोपींविरुद्ध ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी शब्बीर महेताब सय्यद (वय ४५, रा. सोनई, ता. नेवासा), जावेद उस्मान शेख (वय ५२, रा. हलवाई गल्ली, सोनई), सोमनाथ उर्फ गणेश प्रकाश घोरपडे (वय ३५, रा. चिंभळा, ता. श्रीगोंदा), विजय सतीश चोरडिया (वय ३३, रा. चिंभळा) आणि जाकीर इसाक शेख (वय ३९, रा. बेलवंडी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर संकेत अशोक पाचपुते (रा. काष्टी), कमलेश मुरली कृपालीनी (रा. दौंड) आणि फयाज तांबोळी (रा. अहिल्यानगर) हे तीन आरोपी पसार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *