Headlines

सांगलीत एकतर्फी प्रेमाने घेतला बळी?:त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल; 23 वर्षीय तरुणाला अटक




‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर’, असे म्हणत वारंवार फोन आणि मेसेज करून प्रेमसंबंधासाठी दबाव आणला जात असल्याने मानसिक त्रासलेल्या 19 वर्षीय तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. पलूस तालुक्यातील सावंतपूर येथे गुरुवारी (दि. 27) ही घटना घडली. या प्रकरणी पलूस पोलिसांनी संशयित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. ऋतुजा मारुती हलस्कर (वय 19, रा. सावंतपूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तर अंकुर बबन सुतार (वय 23 ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. ऋतुजा पलूस येथील शासकीय आयटीआय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अंकुर कोल्हापूर येथील एका ज्वेलरीच्या दुकानात काम करत होता. नेमकं काय आहे प्रकरण? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुर आणि ऋतुजा हे सावंतपूरमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांमध्ये परिचय आणि ये-जा होती. याच ओळखीतून अंकुर ऋतुजावर एकतर्फी प्रेम करू लागला. मात्र, ऋतुजाकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. गेल्या सुमारे 15 दिवसांपासून अंकुर ऋतुजाला वारंवार फोन आणि मेसेज करत होता. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तूही माझ्यावर प्रेम कर’, अशा आशयाचे मेसेज करून तो तिच्यावर प्रेमसंबंधासाठी दबाव आणत असल्याचे ऋतुजाच्या भावाने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. सततचे फोन, मेसेज आणि मानसिक त्रासामुळे ऋतुजा त्रस्त झाली होती, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. अखेर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ऋतुजाने आपल्या राहत्या घरी जीवन संपवले. या घटनेची माहिती मिळताच सावंतपूर परिसरात खळबळ उडाली. तरुणाला अटक ऋतुजाचा भाऊ दिनेश मारुती हलस्कर (वय 24 ) यांनी घटनेनंतर पलूस पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अंकुर सुतार याच्याविरोधात ऋतुजाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पलूस पोलिस करत आहेत. ऋतुजाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने सावंतपूरसह पलूस तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. हेही वाचा.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मेळाव्यासाठी परभणीत दाखल:आता शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार- मनोज जरांगे पाटील परभणीतील शेतकरी मेळाव्यावरून मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील प्रचंड आक्रमक झाले आहेत. खासदार संजय जाधव यांना थेट इशारा देत त्यांनी हा मेळावा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. परभणीच्या मेळाव्यात काही गडबड झाली तर मी जबाबदार राहणार नाही. मी तिथे आलो तर एकनाथ शिंदे यांना माघारी फिरणे अवघड होईल, असा दम जरांगे यांनी दिला आहे. असे असून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणीत शेतकरी मेळाव्यासाठी दाखल झाले आहेत.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *