रेल्वे स्थानकावर थुंकणे, कचरा टाकणे किंवा इतर कोणत्याही प्रकारे अस्वच्छता करणे आता चांगलेच महागात पडणार आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानक आणि रेल्वे परिसरातील अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम दुप्पट केली आहे. त्यामुळे यापुढे नियमांचे उल्लंघन करणा
.
दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. मुंबईसह देशभरातील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अशा परिस्थितीत काही प्रवाशांकडून स्थानक परिसरात कचरा फेकणे, थुंकणे किंवा इतर प्रकारे अस्वच्छता केली जाते. त्यामुळे स्थानकांची स्वच्छता राखताना रेल्वे प्रशासनावर अतिरिक्त ताण येतो. याला आळा घालण्यासाठी दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार दंडात मोठी वाढ
भारतीय रेल्वेच्या परिसरातील स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या कृतींसाठी शास्ती सुधारणा नियम, 2026 नुकतेच राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार अस्वच्छता करणाऱ्या व्यक्तींवर आकारण्यात येणाऱ्या दंडात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी काही प्रकारच्या अस्वच्छतेसाठी 500 रुपये दंड आकारला जात होता. आता त्याच उल्लंघनासाठी 1 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला पूर्वीपेक्षा दुप्पट फटका बसणार आहे. रेल्वे स्थानकावर किंवा रेल्वे परिसरात कचरा फेकणे, थुंकणे किंवा परिसर अस्वच्छ करणे यासारख्या प्रकारांवर रेल्वे प्रशासनाची नजर राहणार आहे. स्वच्छतेचे नियम मोडताना आढळल्यास संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांनी स्थानक परिसर स्वच्छ ठेवावा, कचरा केवळ निर्धारित ठिकाणीच टाकावा आणि सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
दंड भरला नाही तर थेट न्यायालयात
नियमांचे उल्लंघन केल्यानंतर आकारण्यात आलेला दंड भरण्यास संबंधित व्यक्तीने नकार दिल्यास प्रकरण अधिक गंभीर होऊ शकते. अशा व्यक्तीला सक्षम न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते. त्यामुळे दंड टाळण्याचा प्रयत्न केल्यास न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागू शकते.रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानकांवरील अस्वच्छतेला आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. प्रवाशांनीही रेल्वे परिसर हा सार्वजनिक मालमत्ता असल्याची जाणीव ठेवून स्वच्छता राखण्यास सहकार्य करणे गरजेचे आहे.
हेही वाचा..
ओबीसींना मोठा झटका:1 सप्टेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारली, मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

ओबीसी समाजाच्या वतीने १ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानात प्रस्तावित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी मल्लिकार्जुन पुजारी यांच्या नावाने पोलिसांकडे अर्ज करण्यात आला होता. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी विविध कारणे नमूद करत आंदोलनास परवानगी देण्यास नकार दिला आहे.सविस्तर वाचा..