Headlines

पुण्यात स्वाइन फ्लूचा उद्रेक:जुलैतील 35 रुग्ण ऑगस्टमध्ये थेट 225 वर,नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन




पुणे शहरात स्वाइन फ्लूचा (एच1एन1) संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून समोर आले आहे. जुलै महिन्यात शहरात 35 रुग्ण आढळले होते. ऑगस्टमध्ये ही संख्या थेट 225 वर पोहोचली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा, मंडळे आणि सार्वजनिक ठिकाणी वाढणारी गर्दी पाहता नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला स्वाइन फ्लूचे रुग्ण फारच कमी होते. जानेवारी आणि मार्चमध्ये एकही रुग्ण आढळला नव्हता, तर फेब्रुवारीत दोन रुग्णांची नोंद झाली. एप्रिलपासून रुग्णसंख्या वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिलमध्ये 5, मेमध्ये 10, जूनमध्ये 13 आणि जुलैमध्ये 35 रुग्ण आढळले. मात्र, ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. सुरुवातीला साधी लक्षणे, पुढे धोका स्वाइन फ्लूची सुरुवात साधारणपणे ताप, सर्दी, खोकला आणि घसा दुखणे अशा लक्षणांनी होते. काही रुग्णांमध्ये पुढे न्यूमोनिया होऊ शकतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे किंवा शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचा धोका निर्माण होतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि मधुमेह, हृदयरोग यांसारख्या सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टर सांगतात. गर्दीपासून सावध राहा गणेशोत्सव जवळ आल्याने शहरातील बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. स्वाइन फ्लू हा श्वसनमार्गातून पसरणारा आजार असल्याने संक्रमित व्यक्तीच्या खोकण्याने, शिंकण्याने किंवा बोलण्याने विषाणूचा प्रसार होऊ शकतो. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, आजारी असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे आणि हातांची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. देशात सध्या आढळणारा स्वाइन फ्लूचा विषाणू सौम्य स्वरूपाचा असल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) यापूर्वी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे. “ताप, सतत खोकला, घसा खवखवणे, अंगदुखी किंवा अशक्तपणा अशी लक्षणे दिसत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा. श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे किंवा ऑक्सिजन कमी होण्यासारखी गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्वाइन फ्लूपासून बचावासाठी काय कराल? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे आणि आवश्यक असल्यास मास्कचा वापर करावा. खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड रुमाल किंवा टिश्यूने झाकावे. हात साबणाने वारंवार धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. ताप, सर्दी किंवा खोकल्याची लक्षणे असल्यास घरातच राहून इतरांच्या संपर्कात येणे टाळावे. ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्याने इन्फ्लुएन्झाची लस घेण्याचा विचार करावा. तसेच, स्वतःहून अँटिबायोटिक्स किंवा इतर औषधे घेऊ नयेत. पुणे महापालिकेच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिटच्या आकडेवारीनुसार, जानेवारीत स्वाइन फ्लूचा एकही रुग्ण आढळला नव्हता. फेब्रुवारीत 2, एप्रिलमध्ये 5, मेमध्ये 10, जूनमध्ये 13 आणि जुलैमध्ये 35 रुग्णांची नोंद झाली. मात्र, ऑगस्टमध्ये परिस्थिती गंभीर झाली असून रुग्णसंख्या तब्बल 225 वर पोहोचली आहे. म्हणजेच जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. महिन्यानुसार स्वाइन फ्लूचे रुग्ण : जानेवारी – 0, फेब्रुवारी – 2, मार्च – 0, एप्रिल – 5, मे – 10, जून – 13, जुलै – 35 आणि ऑगस्ट – 225. हेही वाचा.. सुप्रीम कोर्ट अमित शहांच्या खिशात आहे का?:मी आहे ना, सर्व सेट होईल; अमित शहा-एकनाथ शिंदेंच्या कथित संवादावरून संजय राऊतांचा हल्लाबोल मोहन भागवत जी विधाने अमेरिकेत करत आहे ती विधाने भारतात आल्यावर केली पाहिजे. नागपूर आणि दिल्लीमध्ये असे विधाने त्यांनी केली पाहिजे. संघाने भारतात एक आणि बाहेर देशात एक अशी भूमिका घेऊ नये, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षाचे विलीनीकरण होणार नाही, शरद पवारांनी काय सुनेत्रा पवार यांच्या हाताखाली काम करायचे का? त्यांची प्रकृती साथ देत नसली तरी ते शरद पवार आहे. त्यांच्या पक्षात हुशार लोकं आहेत ते योग्य निर्णय घेतील.सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *