Headlines

पालकांना बोलावल्याच्या धास्तीने विद्यार्थीनीची आत्महत्या!:तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले, सातारच्या वाय.सी कॉलेजच्या वस्तीगृहातील घटना




सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स च्या (अर्थात वाय. सी कॉलेज) विद्यार्थी वस्ती ग्रहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून विद्यार्थी आत्महत्या केल्याच्या घटनेने सातारा शहरात खळबळ उडाली आहे संबंधित विद्यार्थिनी मानसिक तणावात असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ही घटना काल रात्री घडलेली आहे आज अभावीपच्या कार्यकर्त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करून विद्यार्थिनी हे टोकाचे पाऊल का उचलले यामागील कारणांचा छडा लावावा यासाठी महाविद्यालय परिसरात आंदोलन केले. सातारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीने वसतिगृहात काही चूक केल्याचे सांगितले जात असून, त्याबाबत तिच्या पालकांना महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून बोलावण्यात आले होते. पालकांना सामोरे जाण्याच्या भीतीने आणि मानसिक तणावातून तिने मंगळवारी (दि. २) रात्री सुमारे उशीरा वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली.उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी या प्रकरणी अद्याप कोणाविरुद्धही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेमागील नेमकी कारणे आणि परिस्थितीचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सखोल चौकशीची मागणी लावून धरत आंदोलन केले. विद्यार्थिनींच्या मृत्यू मागे काही व्यक्तींचा दबाव किंवा मानसिक त्रास कारणीभूत होता काय याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलकांनी केली .संबंधित शिक्षिके विरोधात विद्यार्थीनी वर दबाव टाकल्याचे आरोप होत असल्याने त्यांची ही पोलिसांनी नि:पक्षपातीपणे चौकशी करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या भूमिकेवर आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *