Headlines

Navnath Ban Statement On Raj Thackeray & Sanjay Raut Controversy


गौतमी पाटील ज्या लावणी करतात, त्या लावणीला संजय राऊतांचा विरोध आहे का? राऊतांचा आणि भारतीय संस्कृतीचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध येत नाही. या विषयामध्ये उत्तर आणि दक्षिण असा वाद येतच नाही, कारण चारधाम उत्तरेत आहेत. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत भारत

.

नवनाथ बन म्हणाले की, 2014 पासून राज ठाकरे आपल्या भाषणांमधून सांगत आहेत की महाराष्ट्रात दंगली घडवल्या जातील. परंतु आजपर्यंत राज्यात कुठेही दंगली घडलेल्या नाहीत. अशी चिथावणीखोर भाषणे करण्यापेक्षा त्यांनी आपल्या मुलाला राजकारण शिकवले तर त्यांच्या पक्षावर इतकी वाईट वेळ येणार नाही. स्वतःच्या पक्षाचे चिन्ह कसे असावे हे ज्यांना समजत नाही, त्यांनी दंगलींच्या मुद्द्यावर बोलू नये.

राऊत कुंपणावर नाहीत, तर ढकलपास झालेत

नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत हे स्वतःच कुंपणावर बसले आहेत आणि ते राजकीयदृष्ट्या ‘ढकलपास’ झाले आहेत. आपल्याला काँग्रेसमध्ये जायचे की समाजवादी पक्षात, हेच त्यांना समजेनासे झाले आहे. कोणत्या पक्षाला चांगले भविष्य आहे आणि कोणत्या पक्षात आपला ‘उबाठा’ गट विलीन करावा, याबाबत त्यांच्या मनात भ्रम आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की, जनभावनेचा आदर करूनच निर्णय घेतला जाईल.

हिंदूंच्या सणांना विरोध अन् भोंग्यांना पाठिंबा

नवनाथ बन म्हणाले की, सण-उत्सवांमध्ये अतिशय मोठ्या आवाजात डीजे वाजू नये, या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. परंतु, डीजेवर पूर्ण बंदीची मागणी करणाऱ्यांना भोंगे मात्र चालतात. राऊत, तुम्ही रोज सकाळी उठून खोटेपणाचा भोंगा वाजवता, तो चालतो का? तुमचा विरोध केवळ हिंदूंच्या सणांनाच असून ही तुमची निव्वळ नौटंकी आहे.

महाराष्ट्रात कोणाच्याही जीवाला धोका नाही

नवनाथ बन म्हणाले की, महाराष्ट्रात कोणाच्याही जीवाला धोका नाही. रोज भोंगा वाजवणाऱ्या संजय राऊतांनाही कोणतीही भीती नाही. परंतु, जाणीवपूर्वक हिंदू बांधवांच्या भावना दुखावण्याचे काम करत असाल, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. विद्यानंद बापट मुद्दाम हिंदूंना टार्गेट करत आहेत. त्यांना झालेल्या मारहाणीचे आम्ही समर्थन करत नाही, आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. बापटांच्या जीवाला कोणताही धोका नसून विरोधकांकडून या विषयावर केवळ घाणेरडे राजकारण सुरू आहे.

हे ही वृत्त वाचा

छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजला नव्हता:हिंदू सुरक्षित आहेत, कोणी स्वतःला ‘हिंदूहृदयसम्राट’ समजू नये- संजय राऊत

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांनी गेल्या 10 वर्षांत देशातील सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम केले आहे. आज देशात हिंदू पूर्णपणे सुरक्षित आहेत, त्यांना कोणताही धोका नाही. तरीही सर्व विषय त्याच मुद्द्यावर नेऊन मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. इतिहास साक्षी आहे की, हिंदू ज्या ज्या वेळी संकटात सापडला, त्या वेळी फक्त बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच मदतीला पुढे आली आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. हिंदू सुरक्षित आहेत, त्यामुळे कोणीही स्वतःला ‘हिंदूहृदयसम्राट’ समजण्याचा आव आणू नये, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.