![]()
राज्यात शेतीच्या बांधावरून किंवा जमिनीच्या मालकी हक्कावरून अनेकदा वादविवाद पाहायला मिळतात. मात्र, अशा वादाला जेव्हा हिंसक वळण लागते, तेव्हा परिस्थिती गंभीर बनते. अशीच एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल सावे यांच्या सख्ख्या मोठ्या भावाला आणि पुतण्याला जमिनीच्या वादातून काही अज्ञातांनी रक्त सांडेपर्यंत बेदम मारहाण केली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेमकी घटना काय आणि कुठे घडली? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात घडला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नायगाव खंडेवाडी येथे सावे कुटुंबाची शेतजमीन आहे. या शेतीच्या बांधावरून आणि शेतात जाण्याच्या रस्त्याच्या कारणावरून काही स्थानिक लोकांशी त्यांचा वाद सुरू होता. या वादाने अचानक उग्र रूप धारण केले आणि एका गटाने थेट मंत्री अतुल सावे यांच्या कुटुंबावरच हल्ला चढवला. या हल्ल्यात अतुल सावे यांचे मोठे बंधू अजित मोरेश्वर सावे (वय ७० वर्षे) आणि त्यांचा पुतण्या अमेय अजित सावे (वय ३५ वर्षे) यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. हे दोघेही मूळचे खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहेत. रुग्णालयात दाखल आणि पोलिसांची धाव या गंभीर घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी आणि रुग्णालयात धाव घेतली. सध्या पोलिसांकडून जखमींची विचारपूस केली जात असून, त्यांचे अधिकृत जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. हल्ला करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. घटनेला राजकीय किनार? शेतजमिनीचे वाद आणि भाऊबंदकीतील भांडणे ही ग्रामीण भागात नवी नाहीत. मात्र, या प्रकरणात मारहाण झालेले व्यक्ती हे थेट राज्याच्या विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांचे आणि भाजपच्या एका वजनदार नेत्याचे सख्खे नातेवाईक (भाऊ आणि पुतण्या) असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.दरम्यान, या घटनेला राजकीय चष्म्यातूनही पाहिले जात असून, स्थानिक राजकीय वैमनस्यातून तर हा प्रकार घडला नाही ना? अशी चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींवर आता पोलिस काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. पुण्यात मध्यरात्री थरार: मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून तरुणाचे अपहरण, नाकाबंदीमुळे अवघ्या 53 मिनिटांत सुटका पुण्यातील पेरूगेट पोलिस चौकीच्या हद्दीतून एका 28 वर्षीय तरुणाचे अपहरण झाले. डायल 112 वर माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या 53 मिनिटांत तरुणाची सुटका केली. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रसाद सूर्यवंशी (वय 28) असे सुटका करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मध्यरात्री सुमारे 12:30 वाजता डायल 112 वर पोलिसांना कॉल आला. एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून प्रसाद सूर्यवंशी याचे अपहरण झाल्याचे या कॉलमध्ये सांगण्यात आले. सविस्तर वाचा
Source link
कॅबिनेट मंत्र्याच्या कुटुंबावर हल्ला:जमिनीच्या वादातून अतुल सावेंच्या भावाला आणि पुतण्याला बेदम मारहाण, संभाजीनगरमधील घटना