Headlines

'सुनील तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करतात':आमदार महेंद्र दळवींचा खळबळजनक आरोप, रायगडमध्ये पुन्हा राष्ट्रवादी-शिंदे गटात जुंपली




राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे कंपन्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि अजित पवार गटात अंतर्गत वाद समोर येत आहेत. त्यातच आता थोरवे यांनी केलेल्या आरोपामुळे त्यात भर पडल्याचे दिसत आहे. यामुळे एकूणच महायुतीमध्ये सगळे काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या आंदोलनावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात जुंपली आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर आरोप करत पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आंदोलनकर्त्यांनी स्वतःची झोळी भरण्यासंस्थि केलेली स्टंटबाजी होती. हा प्रकार सगळ्यांच्या लवकरच लक्षात येईल, असे थोरवे यांनी म्हटले आहे. तसेच खालापूर येथील कंपन्यांना राष्ट्रवादी त्रास देण्याचे काम करत असल्याचा आरोपही थोरवे यांनी केला आहे. स्थानिकांना रोजगार देण्याचे काम कंपन्या करतात. मात्र अशा कंपन्या कोणी बंद पाडण्याचा विचार करत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा थोरवे यांनी दिला आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा आणि गोगावलेंची नियुक्ती गेल्या काही दिवसांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्री भरत गोगावले आणि मंत्री अदिती तटकरे यांच्यात मोठी रस्सीखेच सुरू होती. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना सहकार्य करत स्वतःचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे अनिकेत तटकरे यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. या राजकीय तडजोडीनंतर रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ अखेर भरत गोगावले यांच्या गळ्यात पडली. महेंद्र दळवींची अनिकेत तटकरेंवर बोचरी टीका या राजकीय घडामोडींनंतर आमदार महेंद्र दळवी यांनी अनिकेत तटकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला. दळवी यांनी अनिकेत तटकरे यांचा उल्लेख ‘सरोगसी बाळ’ असा करत त्यांच्यावर सडकून टीका केली. तसेच, विधानपरिषद निवडणुकीत जर आम्ही आमचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता, तर तटकरे यांचा राजकीय जन्म झालाच नसता, असा घणाघातही दळवी यांनी यावेळी केला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *