Headlines

परतवाडा येथील दोन सराईत गुंड अखेर पोलिसांच्या जाळ्यात:एमपीडीए कायद्याखाली 1 वर्षासाठी स्थानबद्धतेचा आदेश निघाल्यावर 9 सप्टेंबरपासून होते फरार.




अमरावती, परतवाडा येथील दोन सराईत गुंड रोहित मरसकोल्हे आणि सुरज ठाकूर यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना MPDA कायद्याखाली 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश होते. मात्र, आदेश निघाल्यानंतर ते फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सण-उत्सवांदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी ही मोहीम सुरू केली आहे. याच मोहिमेअंतर्गत परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहित उर्फ चोचु गजानन मरसकोल्हे (वय 29, रा. जुनी वस्ती कांडली, परतवाडा) आणि सुरज उर्फ लल्ला कालीचरण ठाकूर (वय 31, रा. रविनगर, परतवाडा) या दोघांना MPDA कायद्यानुसार 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. हे दोन्ही आरोपी परतवाडा परिसरातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मालमत्ता आणि शरीराला इजा पोहोचवण्यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या निर्देशानुसार, परतवाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या गुंडांविरुद्ध महाराष्ट्र धोकादायक उपक्रमांना प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमानुसार स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. पोलिस अधीक्षकांनी प्रस्तावाची पडताळणी करून मंजुरीसाठी शिफारस केली होती. त्यानुसार, जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 9 सप्टेंबर रोजी आदेश जारी करून रोहित मरसकोल्हे आणि सुरज ठाकूर यांना 1 वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे निर्देश दिले. स्थानबद्धतेचे आदेश निघाल्यापासून हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांचा सतत शोध घेत होते. अखेर 15 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना मोठ्या शिताफीने शोधून ताब्यात घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *