![]()
डोंबिवलीमध्ये चार वर्षीय चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरासमोर खेळत असलेल्या चिमुकलीला शेजारी राहणाऱ्या 85 वर्षीय व्यक्तीने आपल्या घरात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यासोबत अयोग्य प्रकार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात आल्यानंतर तिने तातडीने मुलीला तेथून बाहेर काढले आणि रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. नेमकं प्रकरण काय? मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी चिमुकलीची आई घरातील कामात व्यस्त होती. दरम्यान, चार वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या 85 वर्षीय व्यक्तीने मुलीला आपल्या घरात बोलावून घेतले. मुलगी त्याच्या घरात गेल्यानंतर तिच्यासोबत अयोग्य प्रकार केल्याचा आरोप आहे. काही वेळाने मुलीची आई घराबाहेर आली. त्यावेळी मुलगी दिसत नसल्याने तिने तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना मुलगी शेजाऱ्याच्या घरात असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर मुलीसोबत अयोग्य प्रकार झाल्याचे आईच्या निदर्शनास आले. तिने तातडीने मुलीला तेथून बाहेर काढले. पोलिसांत तक्रार; आरोपीला अटक घटनेनंतर मुलीच्या आईने डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 85 वर्षीय आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 75 (2) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 8 अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत. चिमुकलीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संबंधित व्यक्तींचे जबाब आणि इतर आवश्यक बाबींची पडताळणी केली जात आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. हेही वाचा.. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचाही ‘मार्किंग पॅटर्न’ फुटला:परीक्षा रद्द करण्याची उमेदवारांची मागणी, MPSC ने दिली गैरव्यवहाराची कबुली औषध निरीक्षकपदाचा पेपर फुटल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ती परीक्षा रद्द केली होती. आता या पाठोपाठ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकपदासाठी (गट-क) घेण्यात आलेल्या मर्यादित विभागीय परीक्षेचाही मार्किंग पॅटर्न फुटल्याचे उघडकीस आले आहे. या परीक्षेतही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप उमेदवारांकडून केला जात असून, औषध निरीक्षक परीक्षेप्रमाणेच ही परीक्षा देखील तातडीने रद्द करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता उमेदवारांमधून केली जात आहे. सविस्तर वाचा..
Source link
डोंबिवलीत 4 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; 85 वर्षीय शेजाऱ्याला अटक:घरात बोलावून गैरप्रकार केल्याचा आरोप; पोक्सोसह संबंधित कलमांतर्गत गुन्हा