Headlines

अंबादास दानवेंचा फडणवीसांवर आरोप: मराठवाड्याला पुन्हा फसवू नये:मंत्रिमंडळ बैठकीतील आश्वासने पूर्ण न झाल्याने उद्धव सेना करणार आंदोलन




आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठवाड्याला पुन्हा फसवल्याचा आरोप केला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव सेनेच्या वतीने ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन मराठवाड्यात सुरू आहे. या आंदोलनात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी होणार आहेत. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी सिद्धार्थ उद्यानात अभिवादन केले. यावेळी खासदार अनिल देसाई, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांची अंमलबजावणी झालेली नाही, असे दानवे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी १७ सप्टेंबर रोजी मराठवाड्यातली शेवटची पिढी दुष्काळ पाहणारी असून, यापुढे जनता दुष्काळ पाहणार नाही, असे आश्वासन दिले होते. हे आश्वासन पुन्हा देऊ नये, असे दानवे यांनी म्हटले. मराठवाड्याच्या प्रश्नांवर गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत कार्यालयावर धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात मराठवाड्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी होणार असल्याची माहिती दानवे यांनी दिली. उद्धव सेनेच्या वतीने फडणवीस सरकारविरोधात पुन्हा एकदा जोरदार आंदोलन पुकारले जाणार आहे. उद्धव ठाकरे यांची उपस्थिती शिवसैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *