ठाण्यामध्ये 19 वर्षीय चुलत बहिणीवर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या दोन भावांना कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे, तर एका अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले आहे. पीडितेच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्या
.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांपासून कोपरी आणि कोलशेत येथील घरात या तरुणीवर तिच्याच तीन चुलत भावांनी लैंगिक अत्याचार केले. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. या धमक्यांमुळे भयंकर मानसिक दबावाखाली असलेल्या पीडितेने अनेक महिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, अखेर हिंमत दाखवून तिने आपल्या आईला या सर्व प्रकाराची माहिती दिली.
गुन्हा कापूरबावडी पोलिसांकडे वर्ग
घटना समजताच पालकांनी कोपरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. सुरुवातीला कोपरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला; मात्र तपासादरम्यान गुन्ह्याचे मुख्य ठिकाण कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा गुन्हा पुढील तपासासाठी कापूरबावडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
आरोपींवर कारवाई
कापूरबावडी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन आरोपी भावांना अटक केली आणि तिसऱ्या अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता, 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अल्पवयीन आरोपीची भिवंडी बाल न्यायालयात रवानगी करण्यात आली आहे.
हे ही वृत्त वाचा मी थांबणार नाही, सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतच राहणार:लोकशाहीत जनताच मालक, जामीनावर सुटका होताच संतोष पंडित आक्रमक

विनयभंग प्रकरणात पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर संतोष पंडित यांची काल येरवडा कारागृहातून सुटका झाली. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना पंडित म्हणाले, घडलेला प्रकार हा एक मोठा धक्का होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मी जे काही करत आहे, तो माझा घटनात्मक अधिकार आहे. हा अधिकार मी आधीही बजावत होतो आणि पुढेही बजावत राहीन. वाचा सविस्तर