मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील बिडकीन ‘डीएमआयसी’ला (DMIC) एक मोठा धक्का बसला आहे. अमेरिकन ‘लुब्रिझोल’ (Lubrizol) या बहुराष्ट्रीय कंपनीने आपली तब्बल १,९१४ कोटी रुपयांची गुंतवणूक मागे घेतली असून, त्यासाठी घेतलेल
.
या मोठ्या औद्योगिक नुकसानीवरून विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “उद्योगमंत्री उदय सामंत परदेशात आहेत आणि इकडे राज्यातून उद्योग फरार होत आहेत,” असा सणसणीत टोला दानवे यांनी लगावला आहे.
मराठवाड्याला हेच ‘रिटर्न गिफ्ट’ का?
अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले आहेत. १७ सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करून भाषण केले होते. याचाच संदर्भ देत दानवे म्हणाले की, “१७ सप्टेंबरच्या ‘मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी’ मुख्यमंत्री भाषण करत असताना मराठवाड्याला हेच ‘रिटर्न गिफ्ट’ मिळालं का?” एका बाजूला विकासाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे हातात आलेले मोठे उद्योग राज्याबाहेर घालवायचे, असा थेट आरोप त्यांनी यातून केला आहे.
१,९१४ कोटींचा फटका आणि रोजगार बुडाला
बिडकीन येथील ऑरिक सिटीमध्ये (AURIC) ‘लुब्रिझोल’ कंपनीचा मोठा प्रकल्प उभा राहणार होता. यातून तब्बल १,९१४ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक (FDI) मराठवाड्यात येणार होती, ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. मात्र, कंपनीने अचानक ही गुंतवणूक थांबवून आपला १२० एकरांचा भूखंड सोडल्याने मराठवाड्याचे मोठे नुकसान झाले आहे. यावरून विरोधकांनी आता रान उठवण्यास सुरुवात केली आहे.
“उद्योगांचा दुष्काळ पाडू नका!”
राज्य सरकारकडून वारंवार दावा केला जातो की, आम्ही असे काम करत आहोत की ‘पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही.’ सरकारच्या याच दाव्याची खिल्ली उडवत अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी सरकारला थेट इशारा दिला आहे. “पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही म्हणणारे, आता उद्योगांचा दुष्काळ पाडू नका फक्त!”, असा खोचक सल्ला त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. या नव्या प्रकरणामुळे राज्यात पुन्हा एकदा ‘उद्योग पळवल्याच्या’ मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा..
सत्तेच्या स्थैर्यासाठीच दिवे लावण्याचं फर्मान:मोदींच्या वाढदिवसावरून राऊतांचा भाजपवर घणाघात, म्हणाले- सरकारचा कठीण काळ सुरू झालाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस नुकताच साजरा झाला. या निमित्ताने भाजपकडून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “अशुभ काळाची चाहूल लागल्यामुळेच सत्तेच्या स्थैर्यासाठी आणि मोदींना ऊर्जा मिळण्यासाठी भक्तांना आशिर्वादाचे दिवे लावायला सांगितले जात आहे. पण दिवे लावा, काहीही करा… ग्रह कधीच रजेवर जात नाहीत!”, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला आहे. सविस्तर वाचा