![]()
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत (कृउबास) चालू हंगामातील नवीन मुगाची पहिली आवक झाली आहे. मुहूर्ताच्या लिलावात मुगाला प्रति क्विंटल ७,०८१ रुपये भाव मिळाला. अवर्षण असतानाही पीक घेणारे नांदगावचे शेतकरी राजेंद्र वर्धेकर हे पहिले मूग उत्पादक ठरले आहेत. त्यानिमित्त बाजार समितीने त्यांचा सत्कार केला. वर्धेकर यांनी आपल्या शेतातील नवीन मूग बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता. अडते नारायणदास वैष्णव यांच्यामार्फत या मुगाची विक्री करण्यात आली. व्यापारी जावेद भाई यांनी हा मुहूर्ताचा मूग खरेदी केला. नवीन पिकाच्या आवकमुळे बाजार समितीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेतकरी राजेंद्र वर्धेकर यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. त्यांना नवीन हंगामासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या. यावेळी बाजार समितीचे संचालक पंकज ठाकरे, विवेक वैष्णव, जितेश जांगडा, बाजार समितीचे सचिव अमित मोहोड, कर्मचारी ऋषिकेश चोपडे, प्रवीण काकडे, आशिष शेळके यांच्यासह परिसरातील इतर शेतकरी व व्यापारी उपस्थित होते.
Source link
नांदगाव कृउबासमध्ये मुगाला 7,081 रुपये दर:अवर्षण असतानाही पीक घेतल्याने शेतकरी राजेंद्र वर्धेकर यांचा सत्कार