Headlines

कारल्याच्या पूजा गवळीची लंडनच्या विद्यापीठात निवड:भारत सरकारच्या शिष्यवृत्तीवर उच्च शिक्षण घेणार, भावापाठोपाठ परदेशात शिक्षण




अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कारला येथील प्रयोगशील शेतकरी नंदकिशोर गवळी यांची मुलगी पूजा गवळी हिची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील नावाजलेल्या ‘क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’ येथे निवड झाली आहे. तिने भारत सरकारच्या विशेष शिष्यवृत्तीअंतर्गत हे यश मिळवले आहे. तिच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. नंदकिशोर गवळी यांचा मोठा मुलगा जय गवळी हा देखील सध्या लंडनमध्येच उच्च शिक्षण घेत आहे. आता त्याच्यापाठोपाठ त्याची लहान बहीण पूजा हिनेही मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकत लंडनच्या याच नावाजलेल्या विद्यापीठात प्रवेश मिळवला आहे. एकाच घरातील दोन मुले परदेशात उच्च शिक्षणासाठी गेल्यामुळे गवळी कुटुंबासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. “स्वप्नांना मेहनतीचे पंख असतात आणि तू ते प्रत्यक्षात करून दाखवले,” अशा शब्दांत कारला आणि अंजनगाव सुर्जी परिसरातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून पूजाला शुभेच्छा दिल्या जात आहेत. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील इतर विद्यार्थिनींनाही उच्च शिक्षणासाठी नवीन प्रेरणा मिळाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *