![]()
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवासाठी यंदा ‘किगा आईस्क्रीम’ने ‘किगा कोकोस’ हे खास आईस्क्रीम तयार केले आहे. हे आईस्क्रीम 134 लिटर दुधापासून बनवले असून, नारळाच्या करवंटीसारखा याचा आकार आहे. यात ताज्या ओल्या नारळाचा कीस, शहाळ्याचे छोटे तुकडे आणि मध्यभागी चॉकलेटचा गोडवा आहे. ‘किगा कोकोस’ बनवण्यासाठी तब्बल 134 लिटर दुधाचा वापर करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणात ताज्या ओल्या नारळाचा कीस आणि शहाळ्याचे छोटे तुकडे मिसळले आहेत. यामुळे नारळाची नैसर्गिक चव आणि सुगंध कायम राहतो. या आईस्क्रीमच्या बाहेरील भागात नारळाचा कीस व शहाळ्याचे तुकडे आहेत, तर मध्यभागी चॉकलेटचा भराव आहे. यामुळे ग्राहकांना चव आणि पोत (टेक्सचर) यांचा वेगळा अनुभव मिळेल. या आईस्क्रीमच्या निर्मितीसाठी सुमारे दोन दिवसांचा कालावधी लागतो. योग्य आकार, पोत आणि स्थिरता मिळवण्यासाठी विशेष प्रक्रिया केली जाते. तयार झाल्यावर त्याची गुणवत्ता आणि आकार टिकून राहावा यासाठी ते उणे 22 अंश सेल्सिअस तापमानात गोठवण यंत्रणेत ठेवले जाते. दगडूशेठ हलवाई गणपतीसाठी विशेष प्रसाद म्हणून बनवलेली ही संकल्पना केवळ उत्सवापुरती मर्यादित नाही. पुण्यासह महाराष्ट्रातील किगा आईस्क्रीमच्या विविध विक्री केंद्रांवर ‘किगा कोकोस’ ग्राहकांना उपलब्ध असेल. यामुळे गणेशभक्तांसह आईस्क्रीमप्रेमींनाही या नव्या स्वादाचा आस्वाद घेता येईल. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सवाशी किगा आईस्क्रीमचे हे सहावे वर्ष आहे. यापूर्वी त्यांनी मोदक आईस्क्रीम, मोतीचूर लाडू आईस्क्रीम आणि मोठ्या आकारातील मस्कमेलन आईस्क्रीम अशा अनेक नवीन संकल्पना साकारल्या आहेत. पारंपरिक भारतीय खाद्यपदार्थ आणि आईस्क्रीम यांचा संगम साधत नवीन चव, आकार आणि अनुभव देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. याच परंपरेतून यंदा ‘किगा कोकोस’ची निर्मिती करण्यात आली आहे.
Source link
दगडूशेठ गणपतीसाठी 134 लिटर दुधापासून साकारले ‘कोकोस’ आईस्क्रीम:नारळाच्या करवंटीसारखा आकार, मध्यभागी चॉकलेटचा गोडवा