Headlines

Mumbai Kabutar Khana Controversy; Muni Nileshchandra Demands Reopening


राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबईतील जैन समाजाचा आवाज दाबत असल्याचा आरोप मुनी नीलेशचंद्र महाराज यांनी केला आहे. मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात रविवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुनी नीलेशचंद्र महाराज यांची आठ महिन्य

.

नीलेशचंद्र महाराज म्हणाले की, आठ महिन्यांपूर्वी आझाद मैदानावर जैन समाजाने केलेल्या आंदोलनादरम्यान, ‘कबुतरांना न्याय दिला जाईल’ असे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, अजूनही मुंबईतील सर्व कबुतरखाने बंदच असल्याचा आरोप नीलेशचंद्र यांनी केला. पायधुनी येथील ऐतिहासिक गोडीजी पार्श्वनाथ जैन मंदिरासह शहरातील सर्व कबुतरखान्यांमधील दाणा-पाणी बंद आहे. रविवारी झालेल्या भेटीत त्यांनी राहुल नार्वेकर यांच्यासमोर हा मुद्दा पुनश्च मांडून तातडीने न्याय देण्याची मागणी केली.

गोडीजी मंदिरासमोर आमरण उपोषणाचा इशारा

नीलेशचंद्र महाराज म्हणाले की, कबुतरखाने तात्काळ उघडले गेले नाहीत, तर गोडीजी मंदिरासमोर भव्य आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा मुनी नीलेशचंद्र महाराज यांनी दिला आहे. या वेळी आम्ही कोणाचेही ऐकणार नाही; जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील.

मंगलप्रभात लोढांवर टीकास्त्र

या वेळी मुनी नीलेशचंद्र महाराज यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. लोढा हे जैन समाजाचा आवाज दाबण्याचे काम करत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले जाईल आणि त्यांनतरही जर कबुतरखाने सुरू झाले नाहीत, तर गोडीजी मंदिरासमोर तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हे ही वृत्त वाचा

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीर:शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळणाऱ्या बँकांवर कडक कारवाई, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इशारा

राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून विशेषतः सोयाबीन आणि कापूस या पिकांचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असणे अत्यंत स्वाभाविक आहे. मात्र, अशा कठीण प्रसंगी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे, हीच भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची आहे, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.