Headlines

पुणे विद्यापीठात महात्मा गांधींचे स्मारक उभारण्याची मागणी:अधिसभेच्या ठरावाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे कुलगुरूंकडे निवेदन




सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक सत्वर उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समितीने केली. यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन निवेदन दिले. विद्यापीठाच्या अधिसभेने मार्च २०२५ मध्ये तसेच २०२६ मध्ये फेरप्रस्तावाद्वारे महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यासंदर्भात ठराव मंजूर केला आहे. मात्र, या ठरावावर अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही झालेली नसल्याचे समितीने कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. अधिसभेने मंजूर केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करून पुतळा उभारणीचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी समितीने केली. कुलगुरू डॉ. गोसावी यांनी समितीच्या सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. पुतळा उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक बाबी लवकर पूर्ण करून स्मारक उभारणीच्या दृष्टीने सत्वर कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे समितीने सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या ज्ञानकेंद्रात महात्मा गांधींचा पुतळा उभारणे ही विद्यापीठासाठी गौरवाची बाब ठरेल. सत्य, अहिंसा, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा गांधीजींचा विचार आजच्या सामाजिक परिस्थितीत नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे समितीने नमूद केले. पुणे शहराला महात्मा गांधींच्या वास्तव्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, महात्मा गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले यांच्याशीही शहराचे विशेष नाते आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या परिसरात महात्मा गांधींचे स्मारक आणि अध्यासन उभारणे कालसुसंगत ठरेल, अशी भूमिकाही समितीने मांडली. या वेळी समितीचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, अन्वर राजन, गोपाळ तिवारी, डॉ. हर्ष जगझाप, प्रशांत कोठडिया, महावीर जोंधळे, इंदुमती जोंधळे, नितीन पवार, सिद्धांत जांभुळकर, राहुल गुरधे, अभिजीत मंगल, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते. हेही वाचा.. दगडूशेठ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक: अनंत चतुर्दशीला हौदात मूर्तीचे विसर्जन, ट्रस्टचे 134 वे वर्ष
श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… मोरया, मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पांची श्री वक्रतुंड रथातून वैभवशाली सांगता मिरवणूक पार पडली. अनंत चतुदर्शी ला रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावरील हौदात मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला निरोप देण्यात आला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *