![]()
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोकसंख्या आणि भौगोलिक रचनेच्या दृष्टीने महत्त्व असलेल्या माहुली चोर येथील प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती लोकवर्गणीतून करण्यात आली. त्यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या कृतीमुळे लोकप्रतिनिधींना लाजवेल, अ
.
सदर गाव हे अमरावती-यवतमाळ मार्गावर असल्यामुळे परिसरातील अनेक गावांतील नागरिक येथूनच प्रवास करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था झाली होती. बसण्यासाठीचा ओटा पूर्णपणे उखडला होता. छतावरील टीनपत्रेही तुटली होती. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याकडे या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी कधीही लक्ष दिले नाही. त्यांना हे काम करावेसेच वाटले नाही. अशा स्थितीत गावातील काही युवकांनी एकत्र येऊन या गंभीर समस्येची दखल घेत तो निवारा दुरुस्त केला.
गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही त्यासाठी मदत केली. अंकुश कोल्हे, अंकेश खांडेकर, राजू पवार, अमोल इंगोले, अक्षय पवार, रोशन मेश्राम, आदित्य चोरे, रोशन गाडेकर, नरेंद्र जाधव, संकेत चापले, स्वप्निल चोरे व इतर सहकाऱ्यांनी शिवजयंती ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबवत लोकवर्गणी गोळा केली आणि या लोकवर्गणीतून निवाऱ्याची दुरुस्ती केली. अशाप्रकारे लोकसहभागातून हा प्रवासी निवारा पुन्हा उभा ठाकला.
लोकवर्गणीतून काय केले ? लोकवर्गणीतून याठिकाणी प्रवाशांना बसण्यासाठी नव्याने ओटा बांधण्यात आला. छतावरील टीनपत्रेही बदलण्यात आली. त्यामुळे आता प्रवाशांना उन, पावसापासून संरक्षण मिळत आहे. आरामदायी बसण्याची सोयही उपलब्ध झाली आहे. दरम्यान गावातील तरुणांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत उचललेले हे पाऊल इतरांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे.