Headlines

गद्दाराच्या छताखाली बैठका कशासाठी?:शरद पवारांना बैठकीसाठी अख्खे विधान भवन काय ओस पडले होते? पवारांच्या बैठकीवरून राऊतांचा टोला




शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत, यात शंका नाही. मात्र, ज्यांनी आपले सरकार पाडले, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका घेतल्याने नेत्यांची विश्वासार्हता कमी होते आणि घसरते, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राला भ्रष्टाचार आणि गद्दारीची कीड लावली आहे. पवारांना बैठकीसाठी अख्खे विधानभवन काय ओस पडले होते का? समोरच वाय. बी. चव्हाण प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी भवन असताना गद्दाराच्या दारात जाणे आम्हाला पटत नाही, असेही राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सध्या कमालीचे वैफल्यग्रस्त झाले आहेत. जोपर्यंत ते मुख्यमंत्रीपदावर आहेत, तोपर्यंत राज्यात फावडं घेऊन पैसे काढण्याचे काम सुरू आहे. राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर ते रोज खोटे बोलत असून, विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही, हीच खरी राज्याची बदनामी आहे. फडणवीसांनी आरएसएसने लिहिलेला खोटा इतिहास वाचू नये, हवे तर मी त्यांना खरी इतिहास संशोधक पुस्तके पाठवतो, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
जनतेला ‘कुत्रे’ म्हणणे केवळ सुलतानी राजवटीतच शक्य शासकीय प्रकल्पांमधील भ्रष्टाचारावर बोट ठेवत राऊत यांनी सरकारला ‘सुलतान आणि निजामाची’ जोडी म्हटले. ते म्हणाले, जनतेच्या कराच्या पैशातून मूळ किमतीपेक्षा दुप्पट-तिप्पट खर्च दाखवून प्रकल्प राबवायचे, त्यात 200 ते 500 कोटी रुपये स्वतःच्या खिशात घालायचे आणि नंतर प्रकल्पाचा गाजावाजा करायचा, हा धंदा सुरू आहे. पण जेव्हा त्याच प्रकल्पांना भगदाड पडते आणि जनता जाब विचारते, तेव्हा जनतेला थेट ‘कुत्रे’ म्हटले जाते. हा स्वाभिमानी जनतेचा घोर अपमान असून अशी गुंडशाही केवळ सुलतानाच्या काळातच घडू शकते. ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? महाराष्ट्राचे आमदार-खासदार 50 कोटी रुपयांना विकत घेऊन पक्ष फोडणे ही राज्याची बदनामी नाही का? मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, तेव्हा महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली नाही का? तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांचा अपमान केला, ती बदनामी नव्हती का? असे सवाल करत, महाराष्ट्राच्या बदनामीचे सर्वात मोठे षडयंत्र अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनीच रचल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे. हे ही वृत्त वाचा सीमाप्रश्नी बैठकीनंतर शरद पवारांची शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा: 30 वर्षांनंतर विधानभवनात अशा बैठकीस शरद पवार हजर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात 30 वर्षांनंतर विधानभवनातील अशा बैठकीस शरद पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर ते थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दालनात गेले. त्यामुळे कॅबिनेट बैठक सोडून शिंदे स्वत:च्या दालनात पोहोचले. तेथे पवारांनी आधी त्यांच्याशी बंद दाराआड 20 मिनिटे चर्चा केली. नंतर पवारांनी स्वत:च्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *