![]()
शेंदुरजना घाट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिने मृत्यूपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीनुसार, तिच्या अल्पवयीन प्रियकराने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला, तसेच तिला प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास दिला. यासंपूर्ण प्रकारामुळे आपल्या वडिलांची समाजात इज्जत जाऊ नये, या भीतीने खचलेल्या या अल्पवयीन मुलीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या मुख्य अल्पवयीन प्रियकरासह, त्याला साथदेणारा त्याचा मित्र आणि मृतक मुलीच्या दोन मैत्रिणींविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी 7 जुलैला गुन्हा नोंद केला आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी सोमवारी 6 जुलैला दुपारच्या सुमारास राहत्या घरी चक्कर येऊन पडली. तिने उलट्या केल्या. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी वरुड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले. दरम्यान, तिथे इलाज सुरू असतानाच या मुलीचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. सुरुवातीला मुलीच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नव्हते; तिने विष प्राशन केले, पण का केले? हा प्रश्न कुटुंबीयांना पडला होता. दरम्यान, मुलीच्या मृत्यूनंतर तिची आई घरी परतली आणि तिने मुलीची कॉलेज बॅग तपासली. त्यावेळी त्या बॅगमध्ये मुलीने मृत्यूपूर्व लिहिलेली एक चिठ्ठी (सुसाइड नोट) सापडली. या चिठ्ठीत मुलीने वेदनादायी वास्तव लिहून ठेवले होते. तिचे एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणासोबत गेल्या दहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. या मुलाने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला होता. तिचा शारीरिक छळही केला होता. या प्रकरणात त्याला त्याचा एक मित्र साथ देत होता, तर मुलीच्या स्वतःच्या दोन मैत्रिणी तिला मानसिक त्रास देत होत्या.या छळामुळे मला काय करावे, हे समजत नव्हते, परंतु घडलेल्या या प्रकारामुळे माझ्या वडिलांच्या इज्जतीला मोठा धक्का बसू शकतो; म्हणून मी हा टोकाचा निर्णय घेत आहे,’ असे तिने चिठ्ठीत नमूद केले होते. मृत्यूपूर्व चिठ्ठीमध्ये मुलीने या चौघांनाही कठोर शिक्षा व्हावी, अशी हाक दिली आहे. ही चिठ्ठी वाचताच मुलीच्या आईसह कुटुंबाला धक्का बसला.या प्रकरणी मुलीच्या आईने शेंदुरजना घाट पोलिस ठाण्यात धाव घेऊन मुलीच्या प्रियकरासह त्याचा मित्र आणि मुलीच्या दोन मैत्रिणी अशा चौघांविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी 7 जुलैला उशिरा रात्री चौघांविरुद्धआत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी, प्रियकराविरुद्ध बलात्कार आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.मुलीचा प्रियकर हा अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर केले आहे. इनसाइड पीडित मुलीवर तिच्या प्रियकराने बळजबरीने बलात्कार केला होता, हा धक्का त्या मुलीसाठी सहनशक्तीच्या पलीकडचा आणि प्रचंड असह्य असा होता. त्यातच भर म्हणून, तिच्या दोन मैत्रिणी आणि प्रियकराचा मित्र हे वेळोवेळी तिच्यावर शेरेबाजी करायचे, तिला टोमणे मारायचे. या सततच्या मानसिक छळामुळे पीडित मुलगी अत्यंत तीव्र मानसिक तणावाखाली आली होती. हा बदनामीकारक प्रकार भविष्यात अन्य कुणाला माहीत झाला, तर याचा थेट ताण आपल्या वडिलांवर येईल आणि आपल्यामुळे वडिलांना त्रास झालेला आपण सहन करू शकत नाही, याच भावनेतून तिने हे अत्यंत टोकाचे पाऊल उचलले, असेही तिने मृत्यूपूर्व चिठ्ठीत स्पष्टपणे नमूद केले आहे. चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे चौघांविरुद्ध गुन्हे दाखल घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. अल्पवयीन मुलीने लिहिलेली मृत्यूपूर्व चिठ्ठी जप्त केली आहे. त्या चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे आम्ही चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि विस्तृत तपास सुरू आहे.” -राहुल गवई, ठाणेदार, शेंदुरजनाघाट, पोलिस ठाणे.
Source link
अमरावतीत प्रियकराचा अत्याचार; वडिलांची इज्जत जाऊ नये म्हणून मुलीची आत्महत्या:प्रियकरासह त्याचा मित्र अन् मृतक तरुणीच्या दोन मैत्रिणींविरुद्ध गुन्हा दाखल