![]()
पावसाच्या सुरुवातीचा कालावधी वृक्षारोपणासाठी अत्यंत अनुकूल असल्याने १ ते ७ जुलै या कालावधीत “वन महोत्सव’ अंतर्गत बार्शीटाकळी तालुक्यातील महागाव येथे स्वस्तिक पद्धतीने एक हजार वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला.
.
उपक्रमाचे नियोजन व कार्यान्वयन एस. नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या वृक्षारोपण मोहिमेत श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बाभुळगाव अकोला तसेच सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोला येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. शुभम राठोड यांच्यासह चेतन जाधव, ऋषिकेश खेर्डे, प्रेम सोनवणे, संस्कार पटेल, वीर सारवान आदी स्वयंसेवकांनी श्रमदान करून १००० वृक्षांची लागवड केली. उपक्रमानंतर लावलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी सदस्य आणि सर्व ग्रामस्थांनी स्वीकारली.