Headlines

Dhananjay Munde Warns Maharashtra Govt Over MPSC Student Protest



राज्यात आज महात्मा गांधी जयंतीचा दिवस आंदोलनांचा दिवस ठरल्याचे पाहायला मिळाले. एकीकडे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीने आंदोलन करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दुसरीकडे पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे मोठे

.

शास्त्री रस्त्यावर सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या आणि मागण्या जाणून घेतल्या. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या आपण मुख्यमंत्र्यांची कानावर घातल्या असल्याचे सांगतानाच, “जर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी सुद्धा आंदोलनात सहभाग होईल,” असा थेट इशारा धनंजय मुंडे यांनी सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्र्यांना माझा स्वभाव माहिती आहे

धनंजय मुंडे म्हणाले, माझा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद झाला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठकीसाठी वेळ दिला आहे, मला विश्वास आहे की विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य होतील, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना माझा स्वभाव माहिती आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मी सुद्धा तुमच्यासोबत या ठिकाणी आंदोलनात सहभागी होईल, असे म्हणत एक प्रकारे सरकारला इशाराच त्यांनी दिला आहे.

तुमच्यासोबत आंदोलनात लढण्यासाठी आलोय

पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, मी आज इथे आलोय तुमचे आंदोलन पाहायला नाही, तर तुमच्यासोबत आंदोलनात लढण्यासाठी आलो आहे. हजारो विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत, परीक्षेतील पारदर्शकता असेल, औषध निरीक्षक घोटाळा असेल अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहेत, हे सर्वात मोठे आंदोलन आहे. मी मुख्यमंत्र्यांना फोनवरून तुमच्या मागण्याबाबत सांगितलेले आहे. संपूर्ण माहिती सी.एम सरांना दिलेली आहे, सचिव यांनी राजीनामा द्यावा ही मागणी आहे, रखडलेला निकाल लावा, असे मुंडे यांनी म्हटले आहे.

मागण्या मान्य नाही झाल्या तर..

मी एकदा उतरलो की मी माघार घेणार नाही, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शब्द दिला आहे की, येणाऱ्या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह असेल. पुढच्या आठवड्यात आपल्या विद्यार्थी सोबत बैठक घेऊन आपले सर्व प्रश्न मुख्यमंत्री यांच्याकडून मान्य करून घेऊ, मागण्या मान्य नाही झाल्या तर मी इथ येऊन आंदोलन करणार, असा इशारा धनंजय मुंडे यांनी दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *