Headlines

‘उबाठा’च्या 70 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचे सामूहिक राजीनामे:शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख आशिष गावंडेनी फेटाळले सर्व आरोप‎



आमदार तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आणि महानगरप्रमुख राहुल कराळे या त्रिकुटांनी पक्ष त्यांच्या दावणीला बांधला आहे. पक्षात निष्ठेने काम करणाऱ्या आमच्यासारख्या प्रामाणिक तळागाळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा प

.

येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित या पत्रकार परिषदेला अकोला शहर उत्तर विभागाचे प्रमुख सतीश नागदेवे, विभाग प्रमुख सतीश वानरे, उपविभागप्रमुख मंगेश पावले, अर्जुन क्षिरसागर, रोशन अहीर, गजानन पाल, योगेश गवळी, युवा सेना उपशहरप्रमुख अविनाश कोकरे आदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत पक्षाचे महिला आणि पुरुष कायकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हयातील उद्धव ठाकरे सेनेच्या उपनेत्यांसह जिल्हा-शहर स्तरावरील पदाधिकारी यांनी दाबलेला आमचा आवाज उद्धवजी साहेबापर्यंत पोहोचवा, एवढीच माफक अपेक्षा आहे. शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आमचे म्हणणे ऐकावे. आम्ही पक्ष सोडून अन्य पक्षात जाण्याच्या तयारीत सध्या तरी नाही, असेही या पदाधिकारी यांनी सांगितले आहे. अकोला शहरातील शिवसेना तथा युवा सेना शहरप्रमुख यांची नियुक्ती करताना कुठल्याही पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जात नाही. पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्या व्यक्तीस शहर प्रमुख पद दिले. मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून आयात केलेल्या उमेदवार पराभूत झाल्यावरही त्याला स्वीकृत सदस्य पद देण्यात आली. त्यामुळे शहरातील कट्टर शिवसैनिकांत नाराजी आहे. मनपा निवडणुकीत पक्षातर्फे नगरसेवक पदाची निवडणूक लढवणाऱ्यांना पक्षाच्या जिल्हास्तरीय वरिष्ठांनी एकही प्रचारसभा घेतली नाही. परिणामी पक्षाचे उमेदवार पराभूत झाले. पक्षाचे उपनेते तथा आमदार, जिल्हाप्रमुख आणि शहरप्रमुख हे निष्ठांवत शिवसैनिकांचा सन्मान करत नाही.

अशी आहेत सामूहिक राजीनामा देण्यामागील प्रमुख कारणे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *