![]()
मुंबईत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. देशातील लोकशाही, अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि आंदोलनाच्या अधिकारांवरून त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले. ‘आम्ही रेझिम चेंज करायलाच उभे आहोत’, असे म्हणत त्यांनी सध्याची राजवट उलथवून टाकण्याची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याचा दाखला दिला. बालविवाहामुळे एका लहान मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून प्रबोधनकारांनी लग्नाचा मंडप पेटवून दिल्याचा प्रसंग त्यांनी सांगितला. समाजातील चुकीच्या प्रथा मोडून काढण्यासाठी धाडसाची गरज असते, असे सांगत त्यांनी पत्रकारांनाही समाजाप्रती असलेल्या त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ‘आम्ही रेझिम चेंज करायलाच उभे आहोत’ निवडणुकीच्या माध्यमातून मत व्यक्त करण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार हिरावून घेतला जात असेल, तर सत्ताबदलासाठी उभे राहणे आवश्यक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधकांना देशद्रोही ठरवण्याच्या प्रवृत्तीवर त्यांनी टीका केली. केंद्र सरकारने दिल्लीत मोठ्या संख्येने पोलीस तैनात केले आहेत, त्यांचा वापर आंदोलनकर्त्यांवर कारवाई करण्यासाठी होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘पोलीस दिल्लीत नवरात्रीमध्ये दांडिया खेळण्यासाठी आणून ठेवले आहेत का?’ असा सवाल करत त्यांनी आंदोलकांवर होणाऱ्या कथित मारहाणीचा आणि महिलांना फरफटत नेण्याच्या प्रकारांचा उल्लेख केला. ‘अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत’, असे ते म्हणाले. लोकशाही वाचवण्यासाठी पत्रकारांनी एकत्र येण्याचे आवाहन लोकशाहीचे रक्षण करणे ही केवळ एखाद्या व्यक्तीची जबाबदारी नसून सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी अनेकांनी हातभार लावल्याच्या दाखल्यातून त्यांनी पत्रकारांच्या सामूहिक भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. ‘देशाची वाट लागताना आपण गप्प बसणार असू, तर मग आपण आत्महत्या केलेली बरी’, असे विधान करत त्यांनी देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. बाळशास्त्री जांभेकर, आचार्य अत्रे यांसारख्या पत्रकार आणि समाजसुधारकांचा उल्लेख करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारांवर असल्याचेही त्यांनी नमूद केले. हेही वाचा…. FDA अधिकाऱ्यांना नरहरी झिरवाळांचा कडक इशारा:कार्यक्षेत्राबाहेर जाऊन नियमबाह्य कारवाया केल्यास थेट निलंबनाची कारवाई राज्यात सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (FDA) भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी छापे टाकून संशयास्पद अन्नसाठा जप्त करणे, परवाने निलंबित करणे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा धडाका सुरू आहे. मात्र, या कारवाया करताना काही अधिकाऱ्यांनी आपल्या निर्धारित कार्यक्षेत्राबाहेर जाऊन नियमबाह्य पद्धतीने कारवाई केल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.सविस्तर वाचा….
Source link
‘अशी राजवट गाडलीच पाहिजे’:देशाची वाट लागताना गप्प बसणार असू, तर जगण्याचा अधिकार काय? उद्धव ठाकरेंची टीका