![]()
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान गुलाल उडवण्यावरून दोन गटांत वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
.
माहितीनुसार, २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान मिरवणूक टिपू सुलतान चौकात पोहोचली. या वेळी गुलाल उडवण्यावर काही जणांनी आक्षेप घेतला. त्यातून दोन्ही गटांत बाचाबाचीनंतर दगडफेक झाली. पोलिसांनी जमावाला पांगवत शांतता प्रस्थापित केली. परिसरात राज्य राखीव पोलिस दल, दंगल नियंत्रण पथक आणि पोलिस तैनात केले आहेत.
वाद पूर्वनियोजित होता का याचा तपास सुरू
ही दगडफेक पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास पोलिस करत आहेत. त्यासाठी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले जात आहे. सोशल मीडियावरून कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी सायबर सेलचे घडामोडींवर लक्ष आहे.