Headlines

संभाजीनगरात ‘खून का बदला खून’ स्टेटस ठेवणाऱ्या तरुणाचा खून:मुकुंदवाडी पोलिस ठाण्याजवळच थरार; कुख्यात गुंड दत्ता रोकडेसह तिघांना बेड्या



पुंडलिकनगरात ८ दिवसांपूर्वी झालेल्या रोहित म्हस्केच्या हत्येचा बदला घेण्याचे स्टेटस ठेवणे एका तरुणाला महागात पडले. “खून का बदला खून’ असे स्टेटस ठेवणाऱ्या किशोर रावसाहेब हिवाळे (२४) या तरुणाची ३ कुख्यात गुन्हेगारांनी भरवस्तीत चाकूने भोसकून निर्घृण हत्

.

गुरुवारी किशोर हिवाळे हा भाजीमंडई भागातील देशी दारूच्या दुकानाजवळ आला होता. या वेळी दत्ता रोकडे, शुभम रणशूर आणि कांतीलाल भुईगळ तेथे उभे होते. रोकडेने किशोरला बोलावून घेत त्याच्याशी वाद घातला आणि रणशूरने लोखंडी रॉडने तर रोकडेने चाकूने किशोरवर सपासप वार केले. वर्दळीच्या ठिकाणी किशोर रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.

दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून काढला काटा

या हत्येमागे अपमानाचा बदला आणि गँगवॉरची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. सकाळी जालना रोडवरील एका कापड विक्रेत्याकडे रोकडे आणि किशोरमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. तेथे किशोरने दत्ता रोकडेला धक्का दिल्याने तो खाली पडला होता. आपला अपमान झाल्याच्या रागातून आणि किशोरने सोशल मीडियावर ठेवलेल्या चिथावणीखोर स्टेटसमुळे आरोपींनी त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून त्याचा काटा काढला.

शस्त्राच्या धाकावर हप्ते वसूल करणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अर्जुन कदम, राजेंद्र साळुंके यांच्या पथकाने मुख्य आरोपी दत्ता गणपत रोकडे (३८), शुभम सिद्धार्थ रणशूर आणि कांतीलाल भुईगळ यास अटक केली. दत्ता रोकडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनासह ७ गुन्हे दाखल आहेत. तो दुकानदारांकडून शस्त्राचा धाक दाखवून फोनपेद्वारे हप्ता वसूल करत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *