Headlines

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उदयनराजेंची एंट्री:‘राजकीय जोडे बँकेबाहेर ठेवा’, मंत्री गोरेंना अप्रत्यक्ष टोला




सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी निवडणूक अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मोजक्या समर्थकांसह त्यांनी अर्ज दाखल केला. मात्र, आरबीआयच्या नव्या निकषांमुळे सलग दहा वर्षे संचालक असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविता येणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचे सांगितले जात आहे. उदयनराजे सलग दहा वर्षे संचालक असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. उद्या पौर्णिमा आणि त्यानंतर पितृपंधरवडा सुरू होत असल्याने उदयनराजेंनी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांनी त्यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारले. यावेळी मात्र उदयनराजेंचा पारा चढल्याचे पाहायला मिळाले. ‘सगळं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विचारून करणार आहात का?’ सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भारतीय जनता पक्ष मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी यापूर्वी म्हटले होते. त्यासंदर्भात उदयनराजेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले. ‘बँकेच्या निवडणुकीबाबत कुणाशी बोलायचं काय कारण? ह्याच्याशी बोला, त्याच्याशी बोला. सगळं काही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विचारून करणार आहात का?’ असा उलट सवाल उदयनराजेंनी केला. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ‘राजकीय जोडे बँकेच्या बाहेर ठेवा’ जिल्हा बँकेची निवडणूक सर्वसमावेशक आणि राजकारणविरहित असावी, अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली. ‘ज्या जिल्ह्यात राजकारणाचा शिरकाव झाला, त्या बँका फिनिश झाल्या,’ असे म्हणत त्यांनी सहकारी बँकांमध्ये राजकारण आणण्याला विरोध केला. उदयनराजे म्हणाले की, कोणत्याही बँकेत राजकारण आले तर त्याचा परिणाम संस्थेच्या कामकाजावर होतो. त्यामुळे ‘राजकीय जोडे बँकेच्या बाहेर ठेवले पाहिजेत,’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या हितासाठी बँक टिकली पाहिजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हितासाठी स्थापन झालेली संस्था असल्याचे उदयनराजेंनी सांगितले. बँकेने शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हित जोपासले आहे. त्यामुळेच आज ही बँक भक्कमपणे उभी असल्याचे त्यांनी नमूद केले. बँकेची स्थापना ज्या उद्देशाने झाली, तो उद्देश कोणत्याही परिस्थितीत बाजूला पडता कामा नये. शेतकरी आणि कष्टकरी वर्गाच्या हितासाठी बँक टिकली पाहिजे, अशी भूमिका उदयनराजेंनी यावेळी पुन्हा स्पष्ट केली. हेही वाचा… गडकरी म्हणाले- 40% वायुप्रदूषणासाठी मी जबाबदार:बसेसचा दर्जा सुधारा, नाहीतर कंत्राटदारांना झोडपतो तसे झोडपेन; MP ला मिळाल्या 351 सरकारी बस मध्य प्रदेशात २१ वर्षांनंतर सरकारी बससेवा पुन्हा सुरू झाली. भेल दसरा मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री मोहन यादव यांनी ३५१ बसेससह मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवा सुरू केली. भोपाळ-इंदूरसह ७ शहरांमध्ये इंटरसिटी आणि इंट्रासिटी बस धावतील. यामध्ये १८० इलेक्ट्रिक बस आहेत. सरकारचे पहिल्या वर्षी १,५०० आणि २०३१ पर्यंत १५ हजार बस चालवण्याचे लक्ष्य आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *