Headlines

बाडगीचापाडा परिसरामध्ये बछड्यांनंतर मादीही जेरबंद:अनेक दिवसांपासून परिसरात‎असलेली दहशत अखेर संपली‎



तालुक्यातील ननाशी जवळील बाडगीचापाडा परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांच्या कुटुंबाचा वन विभागाने बंदोबस्त केला आहे. मंगळवारी (दि. २९) रात्री ११ वाजेच्या सुमारास वनपरिक्षेत्राधिकारी सीमा मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या साप

.

बाडगीचापाडा परिसरात बिबट्यांच्या सततच्या वावरामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वन विभागाने या भागात चार पिंजरे लावले होते. या मोहिमेत २३, २४ आणि २६ एप्रिल रोजी ८ ते १० महिने वयाचे दोन नर आणि एक मादी अशा एकूण तीन बछड्यांना टप्प्याटप्प्याने जेरबंद करण्यात आले होते. बछडे पकडले गेल्याने मादी बिबट्या अधिक हिंस्त्र होण्याची शक्यता होती, मात्र मंगळवारी रात्री ती स्वतःही जाळ्यात अडकल्याने ही मोहीम निर्णायक ठरली आहे. पकडण्यात आलेली मादी हीच त्या बछड्यांची आई असल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. मुख्य बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असला, तरी खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने या भागात रात्रीची गस्त वाढवली आहे. ग्रामस्थांनी अद्यापही सतर्क राहावे आणि कोणत्याही वन्यप्राण्याची हालचाल दिसल्यास तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सीमा मुसळे यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *