- Marathi News
- National
- 2.26 Lakh Devotees Reached Kedarnath, 10 Days Of Journey, Crowd At One Shrine, Less Than Half Attendance At All Three Shrines
मनमीत | डेहराडून2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत यंदा नवीन कल पाहायला मिळत आहे. बहुतेक भाविक केवळ केदारनाथ धामाचे दर्शन घेऊनच आपली यात्रा संपवत आहेत. बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री या उर्वरित तीन धामांमध्ये केदारनाथच्या तुलनेत निम्म्याहून कमी भाविक पोहोचले आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या (डेहराडून) माहितीनुसार, गंगोत्री-यमुनोत्री धामाचे दरवाजे १९ एप्रिल रोजी उघडले होते. तेव्हापासून आतापर्यंत येथे अनुक्रमे ६४ आणि ६५ हजार भाविकांनीच दर्शन घेतले आहे. बद्रीनाथचे दरवाजे २३ एप्रिल रोजी उघडले होते. तिथे ७ दिवसांत ९८ हजार भाविक गेले. मात्र २२ एप्रिल रोजी दरवाजे उघडल्यापासून आतापर्यंत २.२६ लाख भाविकांनी केदारनाथचे दर्शन घेतले. म्हणजेच चारधाम यात्रेसाठी आलेल्या ४.०८ लाख भाविकांपैकी ५५% भाविक फक्त केदारनाथला गेले आहेत.
गेल्या वर्षी अशी स्थिती नव्हती. तेव्हा यात्रेच्या सुरुवातीच्या आठवड्यात १.७० लाख भाविक केदारनाथ मंदिरात पोहोचले होते तर ८२ हजारांनी गंगोत्री, ८० हजारांनी यमुनोत्री व १.१० लाख भाविकांनी बाबा बद्रीविशालचे दर्शन घेतले होते.
नवीन हेलिकॉप्टर सेवा : दोन धाम दर्शन, भाडे ~१.३५ लाख
यादरम्यान ‘रुद्राक्ष एव्हिएशन’ने गुरुवारपासून नवीन हेलिकॉप्टर सेवा सुरू केली आहे. ही खासगी सेवा आहे. याद्वारे एकाच दिवसात बद्रीनाथ आणि केदारनाथ बाबांचे दर्शन घेता येईल. कंपनीशी संबंधित सौम्य गुप्ता यांनी सांगितले की, याचे भाडे प्रति प्रवासी १.३५ लाख रुपये आहे. दर्शनाचे चार दिवसांचे संकुल) १.५५ लाख रुपये आहे. यामध्ये एमआय-१७ सारख्या मोठ्या हेलिकॉप्टरने डेहराडूनच्या जौलीग्रांट विमानतळावरून प्रवाशांना नेले जाईल. हे हेलिकॉप्टर मोठे असून यात २०-२५ प्रवासी बसू शकतात.
दोन कारणे : केदारनाथमध्ये यंदा बर्फ, प्रवास थरारक; गंगोत्री-यमुनोत्री दूर
१. केदारनाथ धाम उच्च हिमालयीन क्षेत्रात आहे. येथील २१ किलोमीटरची पायपीट भाविकांना आकर्षित करते. यंदा डोंगरांवर बर्फही आहे. यात्रेचा १० किलोमीटरचा मार्ग बर्फाच्छादित आहे, २. गंगोत्री-यमुनोत्रीची यात्रा करायची असल्यास किमान २ ते ३ दिवस अतिरिक्त लागतात. ऑल वेदर रस्त्याची चांगली जोडणी केदारनाथच्या आधी सोनप्रयागपर्यंत आहे.