Headlines

विद्यार्थ्यांची तंत्रज्ञानाकडे झेप; चिमुकल्यांनी अनुभवले विज्ञान विश्व:राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द शाळेत हायटेक प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांना मिळाले नवे शिक्षण‎



इन्फोसिस स्प्रिंगगार्ड यांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अनोखा अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी, आत्मविश्वास वाढवणारा अन् कुतूहूल निर्माण करणारा ठरला. राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सॉफ्टवेअर कंपनी इन्

.

या उपक्रमात उर्जेचे रुपांतर, टॅब हाताळणे, थ्री डी प्रिंटर, एआय तंत्रज्ञानाचे पायाभूत शिक्षण, प्रश्न निर्मिती असे विषय कृतीतून हाताळले गेले. बाल गोपाळांनी मनातील प्रश्न विचारले. विशेष म्हणजे ही विज्ञान सफर मोफत होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्यांच्या मनातील शंकाचे निरसन व्हावे, एकविसाव्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजात किती मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे याचे छोटे-छोटे उदाहरण प्रयोगाच्या माध्यमातून देण्यात आले. संगणक विश्वातील अग्रगण्य सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिस स्प्रिंगगार्ड यांच्या माध्यमातून ही संधी ग्रामीण भागातील खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाली या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून मोबाइल प्रयोगशाळा शाळेत उपलब्ध झाली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान विषयातील प्रत्यक्ष प्रयोग करण्याची संधी तंत्रस्नेही मार्गदर्शनातून अवघड, संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या नवीन तंत्रज्ञानाशी विद्यार्थ्यांची ओळख कृतीतून शिकण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *