Headlines

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे




संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना पुढे घेऊन जावी लागली ते पण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठीच, असा टोला राणेंनी लगावला आहे. इंडिआ आघाडीकडून महिलांना सन्मान नाही नीतेश राणे म्हणाले की, नारीशक्ती विधेयकाला झालेल्या विरोधामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यामध्ये कुणालाही महिलांचा अपमान करू दिला नाही. म्हणून अजूनही आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. इंडिया आघाडीने या विधेयकाला विरोध केला हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. महिलांना सन्मान देण्याची वेळ आली की काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष महिलांचा सन्मान करत नाही. ..म्हणून नारीशक्तीला विधेयकाला विरोध नीतेश राणे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विरोधात हे काँग्रेस सरकार कोर्टात गेले त्यांना ही योजना बंद करायची होती, त्यांना महिलांचा सन्मान होऊ द्यायचा नाही. माता-भगिणीच्या विरोधात राजकारण करणाऱ्या लोकांनी नारीशक्ती विधेयकाला विरोध केला. त्यांना माहिती होते जर महिलांना आरक्षण मिळाले तर यांना राजकारण करता येणार नाही. नारी शक्ती विधेयक मंजूर झाले नसले तरी पुढच्या काळाज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विधेयक आणतील आणि पास देखील करतील. यामुळे अनेक महिला आमदार आणि खासदार होतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *