Headlines

बोरगावात बुद्ध पौर्णिमेनिमित्त कृतज्ञता ध्यान साधना शिबिर




प्रतिनिधी | बोरगाव मंजू बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून धम्मगिरी इगतपुरीद्वारे संचालित धम्ममंजूषा विपश्यना केंद्र बोरगाव मंजूतर्फे ध्यान साधना धम्म हॉल येथे ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकदिवसीय साधना शिबिरात १२५ जण सहभागी झाले होते. या ध्यान साधना शिबिराचे आयोजन धम्म मंजूषा विपश्यना केंद्र संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. ध्यान साधना करण्यासाठी धम्महॉल उभारण्यात आला असून येथे वर्षभर ध्यान साधना, शिबिर आयोजित केले जातात. शुक्रवारी बुद्ध पौर्णिमेनिमित्ताने एक दिवसीय रात्रीकालीन ध्यान साधना शिबिर उत्साहात पार पडले. शेकडो साधक, साधिका सहभागी झाले होते. शुक्रवारी सायंकाळी ध्यान साधना शिबिराला प्रारंभ झाला होता. २ मे रोजी सकाळी मंगल मैत्री घेऊन शिबिराचे समापन करण्यात आले. शिबिर सहायक आचर्य उषा तायडे, आचार्य वाकोडे, आचार्य झुनझूनवाला, आचार्य रवींद्र पोद्दार यांनी यशस्वी केले. चिंतामुक्त जीवनाचा मार्ग म्हणजे विपश्यना आजच्या गुंतागुंतीच्या व धकाधकीच्या जीवनात शांत व चिंतामुक्त जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे विपश्यना होय. जीवन जगण्याची कला म्हणजे विपश्यना म्हणून या साधना शिबिराचाचे आयोजन करण्यात आले. आगामी काळातही अशा शिबिरांमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बोरगाव मंजू विपश्यना प्रचार समिती, संचालक मंडळ, धम्म मंजूषा विपश्यना केंद्रातर्फे करण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *