![]()
खत, बियाणे, कीटकनाशकांचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक ताण प्रचंड वाढला आहे. हे दर कमी करण्याची मागणी करीत युवकांनी मंगळवारी धरणे आंदोलन केले. काँग्रेसच्या एनएसयूआयतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रखरखत्या उन्हातच आंदोलन करत सरकारला इशारा देण्यात आला. गत वर्षी उन्हाळ्यात मे महिन्याच्या अखेरीस तीन वेळा अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर खरीप हंगामात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे सोयाबीन, कपाशी पिकांची हानी झाली. जून महिन्यात अतिवृष्टीमुळे ४ हजार २१५ हेक्टर, जुलैमध्ये ७ हजार ३१ हेक्टर, ऑगस्ट महिन्यात १ लाख ६ हजार ६४९ हेक्टर, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाली. रब्बी हंगामातील अवकाळी पावसामुळे शेतमालाचे उत्पादन घटले. दरम्यान, आता यंदाच्या खरीप हंगामात तरी गतवर्षीचे झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच कृषी निविष्ठांचे दर वाढले आहेत. शेती करणे कठीण झाले आहे. उत्पादन खर्च वाढूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमतींविरोधात उर्वरित पान ४ २१ हजार मेट्रिक टन जादा साठा गतवर्षी ९३ हजार ७९६ मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले होते. मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी शासनाकडून १ लाख १४ हजार २०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे. यंदा २१ हजार मेट्रिक टन अधिक खतसाठा मंजूर झाले तरी दर वाढल्याने शेतकरी धास्तावले आहे. यापूर्वी पसंतीचे व पुरेसे बियाणे मिळावे, यासाठी शेतकऱ्यांना थेट रास्ता रोको करण्यात आला होता. काळाबाजारात चढ्या दराने बियाणे मिळत होते. तसेच खतही अनेकांना लवकर मिळत नव्हते. यंदा जादा आवंटन मंजूर झाले तरी ते शेतकऱ्यांपर्यंत वेळेत व कोणतीही लूट न होता पोहोचावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Source link
खतांच्या किमती कमी न केल्यास तीव्र आंदोलन:एनएसयूआयचा इशारा; रखरखत्या उन्हातच दिले धरणे