Headlines

करकंबच्या पवन धायगुडेला सुवर्णपदक:रामभाऊ जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा इतिहास; 65 किलो गटात देशात प्रथम, एशियन स्पर्धेसाठी सज्ज‎



रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंबच्या विद्यार्थ्याने कुस्तीच्या आखाड्यात इतिहास रचला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पवन बालाजी (राजू) धायगुडे याने छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या नॅशनल फ्री स्टाईल रेसलिंग स्पर्धेत ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाव

.

भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान ही स्पर्धा पार पडली. फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पवनने आपल्या पहिल्या सामन्यात मिझोरमच्या मल्लाचा पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मध्यप्रदेशचा अमन, तिसऱ्या सामन्यात तामिळनाडूचा ऋषभ, सेमी फायनलमध्ये ओडिशाचा शुभम साहू आणि अंतिम लढतीत राजस्थानच्या सागर विष्णोई या तगड्या पैलवानावर मात करून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय कुमार सिंह यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र व सुवर्णपदक देऊन त्याला गौरविण्यात आले.

पवनला अर्जुन पुरस्कार विजेते काकासाहेब पवार, छत्रपती पुरस्कार विजेते शरद पवार व गोविंद पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच वडील पै. बालाजी (राजू) धायगुडे यांनीही त्याला मोलाचे प्रशिक्षण दिले. या ऐतिहासिक यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव महेश चौप्रा, प्रशासकीय अधिकारी डॉ. विजयकुमार उबाळे, प्राचार्य हेमंत कदम, पर्यवेक्षक धनवंत करळे व सर्व कर्मचारी वृंदाने पवनचे कौतुक करत पुढील आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

माझी शाळा, माझा अभिमान आहे पवनने जिद्द, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना संधी व योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. पवनने ‘माझी शाळा, माझा अभिमान’ हे ब्रीद खऱ्या अर्थाने सार्थ ठरवले आहे. त्याची आता एशियन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. – हेमंत कदम, प्राचार्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *