“राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराचे सत्र सुरू आहे. नेते आणि सेलिब्रिटींवर राजरोसपणे हल्ले होत असताना सामान्य जनतेने कुणाच्या भरवशावर जगायचे? सत्तेत बसलेले महाभ्रष्टयुती सरकार केवळ 56% कमिशनखोरीमध्ये
.
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या गाडीवर जुहू येथे झालेल्या प्राणघातक गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी सोशल मीडिया आणि प्रसिद्धीपत्रकाद्वारे राज्य सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.
नेते, आमदार आणि कलाकार असुरक्षित; कायद्याचा धाक उरलाय कुठे?
राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांचा पाढा वाचताना नाना पटोले म्हणाले, “काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाली. काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. आता बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून 7 गोळ्या झाडल्या जातात. यावरून महाराष्ट्रात कायद्याचा कोणताही धाक शिल्लक राहिलेला नाही, हेच सिद्ध होते.”
सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?
“जर उच्चभ्रू जुहू परिसरात, जिथे पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर आहे, तिथे अभिनेत्यांवर गोळ्या झाडल्या जात असतील आणि राजकीय नेत्यांचे खून पडत असतील, तर गल्लीबोळात राहणाऱ्या सामान्य नागरिकाच्या जीविताचे रक्षण कोण करणार? हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे.”

जुहू येथे नेमकं काय घडलं?
रविवार, 18 ऑक्टोबर रोजी रात्री जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर थरारक हल्ला करण्यात आला. एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या वाहनावर तब्बल 7 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून टायगर श्रॉफ सुदैवाने बचावला असला, तरी गोळीबारात त्याचा कारचालक फिरदोस आणि आणखी 1 व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शूटर्सचा हात असल्याचे समोर येत असून, या घटनेमुळे संपूर्ण कलाविश्वात आणि मुंबईत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
56% कमिशनखोरीत मग्न सरकार; गृहखात्याचा पूर्णपणे बोजवारा!
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवर थेट निशाणा साधताना पटोले म्हणाले, “राज्यात सत्ताधारी पक्ष केवळ कमिशन लाटण्यात आणि विरोधकांना नामोहरम करण्यासाठी यंत्रणांचा वापर करण्यात व्यस्त आहेत. गुन्हेगार, खंडणीखोर आणि टोळ्या मोकाट सुटल्या आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुंबईची अवस्था गुन्हेगारांचे कुरण अशी झाली आहे.” टायगर श्रॉफवरील हल्ल्याची तातडीने दखल घेऊन यातील मुख्य सूत्रधार आणि हल्लेखोरांना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी पटोले यांनी केली.
————————————————————–
हेही वाचा…
महाराष्ट्रात गँगस्टर राज, राज्यात राष्ट्रपती राजवट लावा!: संजय राऊतांची मागणी, दसरा मेळाव्यातून ‘रेझिम चेंज’च्या एल्गाराची घोषणा

“राज्याची राजधानी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि नागपूरमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार आणि हत्येचे सत्र सुरू आहे. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली, अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडल्या गेल्या, ठाण्यात राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांची निर्घृण हत्या झाली आणि आता टायगर श्रॉफच्या गाडीवरही गोळीबार झाला. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून गुंड टोळ्या मोकाट सुटल्या आहेत. जनतेच्या जीविताचे रक्षण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. या राज्यात उघडपणे ‘जंगलराज’ सुरू असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्यपालांनी राज्यात तत्काळ राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी,” अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी