Headlines

फेस्टिव्हलचा महाधमाका!:एसएस मोबाईलतर्फे ‘ग्रँड दसरा ऑफर’चा शुभारंभ; ग्राहकांना ₹25,000 पर्यंतचे फायदे मिळवण्याची संधी




महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये 550 हून अधिक मोबाईल स्टोअर्सचे विस्तृत जाळे असलेल्या एसएस मोबाईलतर्फे दसऱ्याच्या सणानिमित्त ‘ग्रँड दसरा ऑफर’चा शुभारंभ करण्यात आला आहे. या विशेष ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षक दरात स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ऑफरअंतर्गत निवडक स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना ₹25,000 पर्यंतचे फायदे मिळवता येणार आहेत. या ऑफरचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रीमियम स्मार्टफोन्सवरील विशेष किंमती. ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी S25 अल्ट्रा ₹81,999, आयफोन 15 ₹56,999 आणि गुगल पिक्सेल 10A ₹44,999 या आकर्षक effective किमतींमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. टीव्ही खरेदीवरही लाभ विशेष म्हणजे, ‘ग्रँड दसरा ऑफर’ केवळ स्मार्टफोनपुरती मर्यादित नसून स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवरही आकर्षक लाभ उपलब्ध आहेत. ग्राहकांना 43 इंचांचा स्मार्ट टीव्ही आणि 100 वॅटचा साउंडबार केवळ ₹12,999 च्या effective किमतीत खरेदी करता येणार आहे. हमखास कॅशबॅक याशिवाय, स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ₹5,000 पर्यंतच्या हमखास भेटवस्तू, ₹11,000 पर्यंतचा हमखास कॅशबॅक, जुन्या मोबाईलच्या बदल्यात जास्तीत जास्त एक्सचेंज मूल्य आणि एक नव्हे, तर 2 वर्षांची हमखास वॉरंटी असे अनेक आकर्षक लाभ देण्यात येत आहेत. ब्रँडेड अ‍ॅक्सेसरीजवर 75% पर्यंत सूट! ‘ग्रँड दसरा ऑफर’अंतर्गत ग्राहकांना ब्रँडेड स्मार्ट अ‍ॅक्सेसरीजच्या खरेदीवरही 75% पर्यंत आकर्षक सूट मिळणार आहे. स्मार्टवॉच, एअरबड्स, नेकबँड्स, पॉवर बँक्स आणि साउंडबार यांसारख्या विविध अ‍ॅक्सेसरीजवर ही विशेष सवलत उपलब्ध असेल. जेबीएल, बोट, वनप्लस , नॉईज आणि गिझमोर यांसारख्या नामांकित ब्रँड्सच्या स्मार्ट अ‍ॅक्सेसरीज आकर्षक किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना या ऑफरच्या माध्यमातून मिळणार आहे. झिरो डाऊन पेमेंट एवढंच नाही तर, प्रत्येक स्मार्टफोनवर आकर्षक ईएमआय सुविधाही उपलब्ध आहे! जसं की, आयफोन फक्त ₹105 प्रतिदिन EMI वर, तर Ai स्मार्टफोन फक्त ₹1 डाऊन पेमेंटवर! तसेच, सर्व ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर झिरो डाऊन पेमेंट आणि सुलभ ईएमआय योजनांचाही लाभ घेता येणार आहे!!. ही ऑफर 15 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, ग्राहकांनी या आकर्षक ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या एसएस मोबाईल स्टोअरला भेट द्यावी, असे आवाहन कंपनीतर्फे करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *