Headlines

दहावीचा निकाल उद्या!:दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार, बोर्डाची अधिकृत घोषणा; कुठे पाहता येणार रिझल्ट?




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. निकालापूर्वी सकाळी 11 वाजता मंडळाकडून पत्रकार परिषद घेऊन निकालाची अधिकृत घोषणा केली जाईल, ज्यानंतर विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या, शुक्रवार 8 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली असून, परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा उद्या संपणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून आपला निकाल पाहता येईल. दहावीचा निकाल कुठे पाहता येणार? https://sscresult.mahahsscboard.in/
https://results.targetpublications.org/
https://results.digilocker.gov.in
https://mahahsscboard.in
https://results.navneet.com वर दिलेल्या संकेतस्थळांवर दहावीचा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या काही वर्षांपासून दहावी आणि बारावीचे निकाल विक्रमी वेळेत जाहीर करण्याची आपली परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. पूर्वी जून महिन्यापर्यंत लांबणीवर पडणारे हे निकाल आता मे महिन्यातच हाती येत असून, बारावीचा निकाल 2 मे रोजी लागल्यानंतर आता दहावीचा निकालही उद्या, 8 मे रोजी जाहीर होत आहे. या तत्परतेमुळे पुढील प्रवेश प्रक्रिया आणि नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वेळेत होण्यास मोठी मदत होणार असून, दहावीच्या निकालापाठोपाठ आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा मार्गही मोकळा होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *