Headlines

व्यसन-फॅशन सोडून प्रत्येकाने भारतीय संस्कृतीचा अंगीकार करणे काळाची गरज:ठाणगाव येथील कार्यक्रमात संतोष महाराज जाधव यांचे निरूपण‎



मनुष्य जन्म हा अत्यंत दुर्लभ आहे. मात्र, सध्या व्यसन आणि फॅशनच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालला आहे. याचे दुष्परिणाम म्हणून हिंदू समाजातील माता-भगिनी संकटात सापडत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रत्येकाने पुन्हा एकदा भारतीय संस्क

.

ठाणगाव (ता. सिन्नर) येथे श्री स्वामी समर्थ अ ध्यात्मिक व बालसंस्कार केंद्रातर्फे आयोजित श्री स्वामी समर्थ संगीतमय चरित्र कथा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी विविध दृष्टांतातून उपस्थितांना मार्गदर्शन केले. मन ताब्यात ठेवण्यासाठी नमन करण्याशिवाय पर्याय नाही. परमेश्वराकडे काहीही मागताना ते स्वतःसाठी न मागता दुसऱ्याच्या हितासाठी मागा, म्हणजे तुमच्या जीवनात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. अध्यात्मावर सर्वांचा समान अधिकार असून, स्वामी समर्थांच्या इच्छेनुसार संघटित राहणे आवश्यक आहे. आपल्या हातून कोणाचीही अवहेलना होणार नाही याची दक्षता घ्या, तसेच मुलगा आणि मुलगी असा भेदभाव करू नका, असा उपदेश महाराजांनी केला. या संगीतमय कथा कार्यक्रमासाठी सिन्नर तालुक्यासह अहमदनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथेच्या सांगतेनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र संयोजक जयराम शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *