Headlines

'पाय धुवून पाणी पिण्यास सांगितले नाही'- उमेश तांगुडे:आध्यात्मिक गुरुंचा सोशल मीडियावरील चर्चेवर खुलासा, 'श्रद्धा' असल्याचे म्हटले




आध्यात्मिक गुरु उमेश तांगुडे यांनी त्यांच्या अनुयायांकडून पाय धुवून घेतल्याच्या सोशल मीडियावरील चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे. “मी कोणत्याही महिला किंवा पुरुषाला माझे पाय धुवून त्याचे पाणी पिण्यास कधीही सांगितले नाही. ही लोकांची श्रद्धा आहे,” असे तांगुडे यांनी म्हटले. तांगुडे यांनी स्पष्ट केले की, मराठीत ‘माझ्या गुरूचे माझ्यावर इतके उपकार आहेत की, माझ्या गुरूचे पाय धुवून मी पाणी पिले’ अशी म्हण आहे. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेला त्यांनी स्वतः आपल्या गुरूंचे पाय धुवून पाणी प्यायले होते. त्याच दिवशी त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अनेक श्रद्धाळूंनी त्यांचे पाय धुवून पाणी प्यायले. मात्र, त्यांनी या कृतीला विरोध केल्याचे तांगुडे यांनी सांगितले. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या या प्रकारच्या चित्रफितींवरही त्यांनी खुलासा केला. “या चित्रफितींच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा कोणताही उद्देश नाही. मी स्वतः कोणालाही अशा प्रकारे पाय धुवून पाणी पिण्यास सांगितले नाही,” असे त्यांनी नमूद केले. अनुयायी त्यांना ‘पप्पा’ का म्हणतात, यावरही तांगुडे यांनी स्पष्टीकरण दिले. २००६ मध्ये एक मुलगा त्यांच्याकडे आला होता, जो आपल्या पालकांपासून दूर होता. त्यांनी त्याची काळजी घेतली आणि तो त्यांच्या मुलांप्रमाणे त्यांच्यासोबत राहू लागला. त्यामुळे तो त्यांना ‘पप्पा’ म्हणू लागला. त्यानंतर त्यांचे इतर अनुयायीही त्यांना ‘पप्पा’ संबोधू लागले, असे तांगुडे यांनी सांगितले. सोशल मीडियावर या संदर्भात विविध प्रकारच्या चुकीच्या प्रतिक्रिया आणि टिप्पण्या केल्या जात असल्या तरी, “मी कोणालाही मला ‘पप्पा’ म्हणा, असे कधीही सांगितले नाही,” असेही तांगुडे यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *