Headlines

महाराष्ट्राने नाकारलं, ठाकरे आता तामिळनाडूत मुख्यमंत्रीपद शोधताय का?:भोपळा मिळवल्याबद्दल ट्रम्प यांनी ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते- नवनाथ बन




तामिळनाडूमध्ये कोणाला सत्तास्थापनेसाठी बोलवायचे यासाठी राज्यपाल समर्थ आहेत.संजय राऊत यांनी राज्यपाल बनू नये. लोकभावनेचा आदर राखण्याचे काम राज्यपालांकडून करण्यात येईल. सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे अस्वस्थ आहेत, तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर तुम्ही एक पत्र घेऊन जावे की महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला घरी बसवले किमान तामिळनाडूमध्ये तरी आम्हाला शपथविधीला परवानगी द्या, कदाचित राज्यपाल सहानभुती म्हणून तुमच्या अर्जाचा विचार करतील, असा खोचक टोला, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी लगावला आहे. नवनाथ बन म्हणाले की, अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले त्यानंतर संजय राऊत हे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ट्रम्प यांचे चुकलेच त्यांनी उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करायला पाहिजे होते की महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि मनपाच्या निवडणुकीत सर्वांत मोठा भोपळा मिळाला. आपले आमदार सांभाळता आले नाही म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करायला हवे होते. संजय राऊत यांनी आपल्या पक्षाचे हाल काय आहेत हे पाहूण ट्रम्प यांना प्रश्न उपस्थित केला पाहिजे. ज्यांच्याकडे बहुमत त्यांची तामिळनाडूत सत्ता नवनाथ बन म्हणाले की, सर्वांत मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवले जाते. पण तामिळनाडूमध्ये राजकीय स्थिती पाहिली तर वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत, त्यातून जो योग्य बहुमत सिद्ध करू शकेल त्याला सत्तास्थापनेसाठी बोलवले जाईल. केरळमध्ये कोणी आडकाठी करत नाही. बहुमत असेल त्याला सरकार स्थापनेसाठी बोलवले जाईल. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न तामिळनाडूमध्ये पूर्ण होई शकेल असे संजय राऊत यांना वाटत असेल म्हणून ते तिथल्या राज्यपालांवर टीका करत आहेत. म्हणून त्यावेळी शपथविधी झाला नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीच्या वेळी अजित पवारांनी आपल्या आमदारांच्या समर्थनाचे पत्र राज्यपालांना दिले होते. त्यावेळी काही मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलवले नव्हते. त्या पत्राच्या जोरावर बहुमताचा आकडा पुढे जात असल्याने सत्तास्थापनेसाठी बोलवले होते. म्हणून त्यावेळी शपथविधी झाला होता. तुमचा पक्ष शेवटचा श्वास घेत आहे. भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे. आम्ही जिंकलो तर लोकशाहीचा गळा दाबला जातो म्हणणारे काँग्रेसचे लोकं जिंकल्यावर लोकशाही जिंकली असे म्हणतात.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *