Headlines

वंचित घटकांत योजना पोहोचविण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी:कन्नडला महाराजस्व अभियानाचा उत्साहात समारोप‎




शासनाच्या योजना दुर्गम भागात आणि वंचित घटकात पोहचविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून जनजागृती करण्यात येत आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांनीही त्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांनी शुक्रवारी महाराजस्व अभियानाच्या समारोप प्रसंगी केले. छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या इनडोअर सभागृहात आजपर्यंत दहा मंडळात झालेल्या महाराजस्व अभियानाचा समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी गोरड म्हणाले, शासनाने आता एनए करण्याची जुनी क्लिष्ट पध्दत बंद केली आहे. लेआऊट मंजूर करून थेट सक्षम प्राधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळणार आहे. प्रास्ताविक करताना तहसीलदार सारिका भगत म्हणाल्या की, विकसित महाराष्ट्र या धोरणाकडे शासनाची वाटचाल करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. तालुक्यातील कन्नड, हतनुर, नागद, चापानेर, देवगाव रंगारी, करंजखेड, चिंचोली लिंबाजी, नाचनवेल पिशोर आदी दहा मंडळात महाराजस्व शिबिरे घेऊन लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळून देण्याचा प्रयत्न केला. एकही लाभार्थी शासकीय योजनेपासून वंचित राहू नये यासाठी सर्वाधिकारी कर्मचाऱ्यांनी जागृत राहण्याची गरज आहे. याप्रसंगी नगराध्यक्षा फरीन बेगम, नगरसेवक अब्दुल जावेद, परिक्षाविधिन उपविभागीय अधिकारी लता बागुल, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे, नायब तहसीलदार निलेश राठोड, कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड, विद्युत विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय अधिकारी आर.पी. वाकचौरे, मंडळ अधिकारी रंजना कल्याणकर, राजामणी कुशोड, वर्षा पेहेरकर, वंदना भिंगारे, गोकुळ राठोड, विद्या काशीनंद, वर्षा ताठे, संदीप घोंगते, विकास वाघ, पांडुरंग सुरवसे, दीपक एरंडे, बाळू घटे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संतोष निकम, बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, पोलिस निरीक्षक डॉ. रामचंद्र पवार, रघुनाथ सानप आदींची मंचावर उपस्थिती होती. यावेळी शरद दांडगे, अशोक निकाळे, सतीश बनकर, समाधान साळवे, डी.व्ही. गोसावी, संतोष सवाई, नायब तहसीलदार प्रशांत काळे, ज्ञानेश्वर दाबके, एस. एस. जोगदंड, मुगले, प्रांजल अल्हाड, आकाश बोलधने, गजानन आव्हाळे आदींसह नागरिक उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रविण दाभाड यांनी तर आभार नायब तहसीलदार दिलीपकुमार सोनवणे यांनी मानले. श्रावणबाळ योजनेच्या ९९१ लाभार्थींना प्रमाणपत्र वाटप यावेळी संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या ९९१ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. नगरपरिषद अंतर्गत ४९ लाभार्थ्यांना ८३ हजार ३०० रुपये अनुदान वाटप करण्यात आले. २८ बचत गटांना प्रमाणपत्र विक्री करण्यात आले. पंतप्रधान आवास योजना, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अदा करण्यात आले. ३० अपंगांना शिधापत्रिका वितरित करण्यात आल्या. तसेच जात, अप्रगत उत्पन्न गट प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. भुमिअभिलेख, नगरपरिषद, कृषी, विद्युत वितरण, आरोग्य विभागाच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कामे मार्गी लावण्याची गरज, प्रशासनाने जनजागृती करावी Ãमहाराजस्व अभियानाचे मुळ उद्दिष्ट शासकीय योजना वाड्या, तांड्यावरील वंचितांपर्यंत पोहचविणे हा आहे. तालुक्यात दहा मंडळात अभियान झाले. अभियानासाठी जनजागृती आवश्यक आहे. अन्यथा हा केवळ सोपस्कार ठरेल. सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी आठवड्यातून पाच दिवस जरी मुख्यालयी थांबले तरी जनतेची प्रलंबित कामे मार्गी लागतील. – डॉ. संजय गव्हाणे, जिल्हा परिषद सदस्य



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *