![]()
पाचोड शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर यश नक्की मिळते, हे सानपवाडी (ता. पैठण) येथील कैलास प्रल्हाद जाधव आणि योगेश भगवान मगरे या दोन तरुणांनी सिद्ध केले आहे. पोलीस दलात शिपाई म्हणून कार्यरत असताना, खात्यांतर्गत परीक्षेत यश मिळवून या दोघा
.
कैलास जाधव यांची २०१४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे, तर योगेश मगरे यांची २०१७ मध्ये मुंबई पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून भरती झाली होती. कर्तव्याचा कडक बंदोबस्त सांभाळून दोघांनीही अभ्यासाचे सातत्य राखले. शारीरिक मेहनत आणि दृढ आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी पीएसआय परीक्षेत यश मिळवले.
या यशाबद्दल गुरुवारी सानपवाडीत फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाच्या उधळणीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे, दीपक वाकडे, सरपंच लतीफ सय्यद, उपसरपंच विलास गायकवाड, गणेश गायकवाड, बाबासाहेब शरणागत, रामदास गायकवाड, धर्मराज गायकवाड, विष्णू जाधव, यशवंत गायकवाड, राजेंद्र सुवर्णकर, भगवान मगरे, मुंबई पोलिस राजेश मगरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सानपवाडी येथील दोन तरुणांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना जि.प. सदस्य शिवराज भुमरे.