Headlines

कोरफळे हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता:बाेधले महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यास हजारो भक्तांचा सहभाग‎




छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरफळे ( ता. बार्शी) येथील आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी गुरूवर्य डॉ जयवंत महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने अतिशय धार्मिक व भक्तीमय वातावरणात झाली. यावेळी कोरफळे व परिसरातील गावातील हजारो भक्त उपस्थित होते. अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाच्या काळात दररोज सकाळी काकड आरती, गाथा भजन, , हरिपाठ, किर्तन,व्याख्याने ज्ञानेश्वरी पारायण अशा प्रकारे दिनक्रम पार पडला असून, सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत किर्तन कारांनी समाजप्रबोधन करण्यात आले. सकाळी गावातील मुख्य मार्गावरून गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांचे उपस्थित संत माणकोजी बोधले महाराज वारकरी शिक्षण संस्था बळेवाडी येथील वारकरी मुले, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन गावातील महिला व हाती भगवी पताका घेऊन वारकरी पुरुष व संवादनी कलाकार यांच्या उपस्थितीत टाळ- मृदुंग व हरिनामाचा गजर करत अतिशय भक्तिमय वातावरणात गावातून ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा उत्साहात काढण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर सडा, रांगोळी घालून स्वागत केले. दिंडी प्रदर्शना पूर्ण करुन परत कार्यक्रमांचे मुख्य ठिकाणी आणण्यात आली व पुढील दैनंदिन कार्यक्रम झाले. गुरूवर्य डॉ जयवंत महाराज बोधले बोधले महाराज यांनी काल्याच्या किर्तनात उपस्थित भाविकांना विविध दृष्टांत देत भक्तीचे महत्व पटवून सांगितले, परमार्थ करताना अनुकूल शरीर असावं लागतं, जोपर्यंत अनुकूल शरीर आहे तो पर्यंत परमार्थ, एकदा का शरीर प्रतिकूल झालं की परमार्थाच्या आनंदाचा भोग घेता येत नाही. म्हणून आनंदाच्या भोगा करीता शरीर अनुकूल असावं लागतं. जशी शक्तीची गरज आहे, तशी मतीची गरज आहे, परमार्थ करता मती पाहिजे, परमार्थ करणे हा लेकरांचा खेळ नाही . परमार्थात मनांमध्ये येणाऱ्या श्रद्धेला तत्परतेची जोड असावी लागते.परमार्थ करणे सोपे आहे पण त्या सारखा वागण फार कठीण आहे, असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दहिहंडी कार्यक्रमानंतर महाप्रसाद वाटप एखाद्या हरिनाम सप्ताहामध्ये कीर्तनाबरोबर व्याख्यानमालेचा प्रयोग हा संपूर्ण महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदा सूरु आहे. दहिहंडी कार्यक्रम पार पडल्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले.हा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात पार पाडण्यासाठी गावातील सर्व ग्रामस्थ,भजनी मंडळी, यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *